आमच्या यांनाही सोबत घ्या !

By Admin | Updated: June 23, 2014 01:16 IST2014-06-23T01:16:13+5:302014-06-23T01:16:13+5:30

ग्रामीण विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. ही बाब विचारात घेता विकासाचे ज्ञान व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्यांंचा सात दिवसाच्या अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

Take us along with them too! | आमच्या यांनाही सोबत घ्या !

आमच्या यांनाही सोबत घ्या !

जि.प. अभ्यास दौरा : पतीराजांना घेण्याचा अट्टाहास
नागपूर : ग्रामीण विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. ही बाब विचारात घेता विकासाचे ज्ञान व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्यांंचा सात दिवसाच्या अभ्यास दौरा आयोजित केला आहे. परंतु काही महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सोबतीला पतीराज असावे, असा अट्टाहास धरला आहे. त्यांचा अट्टाहास पूर्ण केला तर यावर होणारा अतिरिक्त खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून जि.प.सदस्यांना विकासाच्या योजना, लोकसहभागातून गावाचा विकास, ग्राम स्वच्छता, हागणदारीमुक्ती, पाणीपुरवठा व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याविषयी माहिती होणे अपेक्षित आहे. दौऱ्यादरम्यान निर्मल ग्राम अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांना सदस्य भेटी देणार आहेत. यापूर्वी दोनवेळा अभ्यास दौरा निश्चित करण्यात आला होता. आता मंगळवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनाची माहिती नसल्याने त्यांचा पतीला सोबत घेण्याचा आग्रह वाजवी असला तरी यावर होणारा अतिरिक्त खर्च कोण करणार असा प्रश्न आहे. प्र्रशासनाने दौऱ्यासाठी सदस्यांची आधीच सहमती घेतली आहे. काही सदस्यांनी सहमती दर्शविली. परंतु पतीला सोबत घेता येत असेल तरच आम्ही दौऱ्यात सहभागी होऊ, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे जि.प.च्या ५९ सदस्यापैकी २५ ते ३० सदस्यच दौऱ्यात सहभागी होतील, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Take us along with them too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.