शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 9:59 PM

जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देभरारी पथके तपासणार फेरोमन ट्रॅप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिले.छत्रपती सभागृहात आयोजित कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, सीआयसीआरचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. वासनिक, डॉ. विश्लेष नगरारे, प्रा. डॉ. राहुल वडस्कर, डॉ. अनिल मोरे, प्रा. राम गावंडे, प्र. दि. देशमुख आणि तंत्र अधिकारी अर्चना कोचरे यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्ह्यात झालेल्या विविध पीक पेरणीचा आढावा घेतला. प्रामुख्याने कापूस, धान, तूर, मका, संत्रा, ऊस आदी पिकांखालील क्षेत्र, पुढील काही दिवसांमध्ये पावसाने अल्पविश्रांती घेतल्यास धान रोवणीचा वेग वाढेल. त्यामुळे जिल्ह्यातील धान पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल. त्याची आठवडाभरात पिकांखालील क्षेत्रात होणाऱ्या वाढीची माहिती संकलित करावी. तसेच भविष्यात पावसाने दडी मारली अथवा अतिवृष्टी झाल्यास पीकविमा, पिकांवर पडणारे रोग, कापूस आणि मका पिकांवर गुलाबी बोंड अळी आणि अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणारच नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.गुजरात राज्याच्या धर्तीवर जिनिंग प्रेसिंग आणि कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. औषधे, खते आणि बी-बियाणे तपासणीसाठी भरारी पथके नेमली जातात, तशी भरारी पथके नेमावीत. या पथकांनी उद्यापासून जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप लावले आहेत की नाहीत. तेथील कीडयुक्त कापूस बियाणे नष्ट केल्याची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिलेत.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आतापर्यंत जिल्ह्यात झालेली पीक पेरणी आणि पुढील आठवडाभरात पिकाखालील क्षेत्रात वाढ होईल, याबाबतचा आढावा घेतला.गावसभा व शेतीशाळा घ्यागुलाबी बोंड अळी आणि अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात गावसभा आणि शेतीशाळा घ्याव्यात. तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांनी शेतीशाळांच्या माध्यमातून पतंग पकडण्यासाठी फेरोमन सापळे, ल्यूर्स, ट्रायकोकार्डबाबत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीसाठी निंबोळी पावडर आणि पावडरपासून अर्क बनविण्यासाठी जिल्ह्यातील महिला बचत गटांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर निंबोळी विक्री केंद्राचे काम द्यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरagricultureशेती