शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसीए स्टेडियम ताब्यात घ्या

By admin | Updated: January 12, 2017 20:54 IST

विदर्भ क्रिकेट संघटनेकडून थकित सुरक्षा व्यवस्था शुल्क वसुल करण्यासाठी जामठा स्टेडियम ताब्यात घेण्यात यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिका-यांना

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 12 - विदर्भ क्रिकेट संघटनेकडून थकित सुरक्षा व्यवस्था शुल्क वसुल करण्यासाठी जामठा स्टेडियम ताब्यात घेण्यात यावे अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिका-यांना पत्र लिहून केली आहे. संघटनेकडे १ कोटी ३० लाख रुपये सुरक्षा व्यवस्था शुल्क थकित आहे. सहायक सरकारी वकील व्ही. पी. मालधुरे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संघटनेकडे ४ कोटी ५० लाख रुपये  सुरक्षा व्यवस्था शुल्क थकित होते. त्यापैकी ३ कोटी २० लाख रुपये संघटनेने महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले आहेत असेही मालधुरे यांनी न्यायालयाला सांगिलते. दरम्यान, संघटनेचे वकील अक्षय नाईक यांनी यावर उत्तर सादर करण्यासाठी ३ आठवड्यांचा वेळ देण्याची मागणी न्यायालयाला केली. परंतु, न्यायालयाने प्रकरणाची गंभिरता लक्षात घेता  ही मागणी अमान्य करून केवळ एक आठवड्याचा वेळ मंजूर केला. गृह विभागाने ३ जानेवारी २००० रोजी परिपत्रक जारी करून एक व्यक्ती किंवा नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी मार्गदर्शकतत्वे ठरवून दिली आहेत. तसेच, १७ मार्च २०१६ रोजी आदेश जारी करून क्रि केट सामन्यांसाठी पोलीस सुरक्षा प्रदान करण्याकरिता संपूर्ण राज्यात एकसमान शुल्क निश्चित केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हरनीश गढिया यांनी बाजू मांडली.समानतेच्या अधिकाराचे उल्लंघनविदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर २०१० ते २०१६ या काळात अनेक क्रिकेट सामने खेळल्या गेले. यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. त्याचे कोट्यवधी रुपये संघटनेकडे थकित आहेत. सामान्य व्यक्तीला सुरक्षा हवी असल्यास आधी शुल्क घेतले जाते व त्यानंतर  सुरक्षा दिली जाते. परंतु, संघटनेच्या बाबतीत शिथिल भूमिका घेण्यात आली. संघटनेकडून आधी शुल्क न घेता पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला. त्यामुळे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन झाले. संघटनेकडून तातडीने थकित शुल्क वसुल करण्याचे निर्देश देण्यात यावेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.