शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कोणत्याही रेशन दुकानातून घ्या धान्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:56 IST

रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे, हे विशेष.

ठळक मुद्देरेशन कार्डधारकांसाठीही ‘पोर्टेबिलिटी’ : नागपूरने राबवलेला प्रयोग राज्यभरात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे, हे विशेष.मोबाईल ग्राहकांना ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलविता येते, त्याच प्रकारची ‘पोर्टेबिलिटी’ची सेवा आता रेशन कार्डधारकांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे कार्डधारक कोणत्याही रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य माफक दरात विकत घेऊ शकतो.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर व्हाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एईपीडीएस आणि आधार लिंक करण्यास सुरुवात केली. नागपूर शहरात ९९.९५ टक्के रेशनकार्ड आधारने जोडण्यात आले. नागपूर रेशन विभागाचे एकूण काम पाहता सरकारने नागपूर शहरात पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला. आधार आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था असे याला नाव देण्यात आले. यात नागपूर शहरातील रेशन कार्डचे डिजिटायझेशन करण्यात आले. प्रत्येक रेशन कार्डला आरसीआयडी (रेशन कार्ड आयडेन्टीफिकेशन नंबर) देण्यात आले. यासोबतच शहरातील सर्व ६६५ रेशन दुकानांना पॉस मशीन (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनद्वारे धान्य विक्रीचे व्यवहार होऊ लागले. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक व्यवहार अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येत आहे. आधार लिंक व आरसीआयडी नंबरमुळे पोर्टेबिलिटीची सुविधाही उपलब्ध करून देता आली. ही प्रणाली आता संपूर्ण राज्यात अवलंबिली जात आहे. सार्वजनिक धान्य वितरणात पारदर्शकतासार्वजनिक अन्न पुरवठा विभागात नवीन आधुनिक प्रणाली विकसित झाल्याने धान्य वितरणात पारदर्शकता आली आहे. आम्ही एका ठिकणी बसून राज्यातील कुठल्याही रेशन दुकनातील व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतो. तसेच पोर्टेबिलिटीमुळे ग्राहकांनाही आता अधिक सुविधा झाली आहे. त्याचा उपयोही सुरू झाला आहे.पी.एस. काळेजिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर