शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

‘दुकानदार’ शाळांवर कारवाई करा; नागपूर खंडपीठाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 03:10 IST

शालेय साहित्य विक्रीद्वारे केली जाते पालकांची लूट

नागपूर : शालेय साहित्यांची दुकानदारी करणाऱ्या शाळांना नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार दणका दिला. तक्रारी आल्यास अशा दुकानदार शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारला देण्यात आले.यासंदर्भात संदीप अग्रवाल व बद्रीप्रसाद अग्रवाल यांनी याचिका दाखल केली होती. ११ जून २००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, विद्यार्थ्यांच्या पालकांना विशिष्ट ठिकाणाहून शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली गेल्यास कारवाई करणे गरजेचे आहे. शाळांचे अनुदान बंद करणे, मान्यता रद्द करणे, शाळा विनाअनुदानित असल्यास त्यांना नोटीस बजावणे, सरकारी जमीन दिली असल्यास ती परत घेणे, करलाभ व अन्य सवलती बंद करणे, त्यांना पुन्हा शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी न देणे, नाहरकत प्रमाणपत्र मागे घेणे, आदी कारवाई करण्यात येऊ शकते. परंतु, शिक्षण विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, राज्य सरकारने या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याची हमी दिली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश देऊन ही याचिका निकाली काढली. तसेच, सरकारचे वक्तव्य आदेशात नोंदवून घेतले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राधिका रासकर तर, सरकारतर्फे अ‍ॅड. एम. एस. नाईक यांनी बाजू मांडली.दुकानदारी अशी होते...शाळा व्यवस्थापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेश, स्कूलबॅग, नोटबुक्स, पुस्तके, पेन इत्यादी शालेय साहित्य विकले जाते किंवा विशिष्ट दुकानांतून हे साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांची पुस्तके वापरणे आवश्यक असताना, खासगी प्रकाशकांची पुस्तके घेण्याचा आग्रह केला जातो. तसेच, दरवर्षी नवीन गणवेश घेणे बंधनकारक केले जाते. शासन निर्णयानुसार ही कृती अवैध आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टSchoolशाळाEducationशिक्षण