शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

नागपुरातील महाविद्यालयांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 10:42 AM

नागपूर : शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अकरावी प्रवेशासाठी सुरू केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडनंतरही कॉलेजच्या ६५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

ठळक मुद्देअकरावीच्या तब्बल ६५ टक्के जागा रिक्तदुसऱ्या फेरीनंतरही २०,००० जागांवरच प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अकरावी प्रवेशासाठी सुरू केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राऊंडनंतरही कॉलेजच्या ६५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. गुरुवारी तिसऱ्या राऊंडसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यानुसार जागांचे आवंटन करण्यात आले आहे.शहरातील विविध महाविद्यालयात कला, वाणिज्य, एमसीव्हीसी आणि विज्ञान शाखेच्या ५८,२४० जागा आहेत. त्यापैकी २०,८२९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या राऊंडमध्ये १४,७१७ जागा भरल्या गेल्या होत्या तर दुसऱ्या टप्प्यात ३,८१० जागांवर प्रवेश पूर्ण झाले. बायफोकलच्या २,३०३ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहे. यानुसार अद्याप ३७,४११ जागा रिक्त राहिल्या आहेत. गुरुवारी तिसऱ्या राऊंडसाठी जागा निर्धारित करण्यात आल्या. शिक्षण विभागाला मात्र रिक्त जागांचा ग्राफ कमी होण्याचा विश्वास आहे. सध्या बोर्डाची दहावीची पूरक परीक्षा सुरू आहे. त्यामुळे पूरक परीक्षेच्या निकालानंतर ८० ते ८५ टक्के जागा भरल्या जाण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.शिक्षण विभाग दावा करीत असला तरी महाविद्यालयांना मात्र या दाव्यावर विश्वास नाही. कॉलेजच्या शिक्षकानुसार पूरक परीक्षेमध्ये नागपूर शहरातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. दुसरी बाब म्हणजे बहुतांश विद्यार्थी विभागाच्या दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पूरक परीक्षेचे निकाल आल्यानंतरही या स्थिती सुधारेल, अशी शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे चौथ्या राऊंडनंतर शिक्षण विभागाने महाविद्यालयांना जागा भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाविद्यालयांनी केली आहे.

नावाजलेल्या कॉलेजच्या जागाही रिक्तसूत्राच्या माहितीनुसार, शहरातील टॉप टेनमध्ये येणाऱ्या नावाजलेल्या कॉलेजमध्येही कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसीच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. तिसऱ्या राऊंडमध्येही या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळाले नाही. त्यामुळे त्यांनाही चौथ्या राऊंडची वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र