शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू

By सुमेध वाघमार | Updated: October 6, 2023 13:05 IST

सहा मृत्यूची नोंद : तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश

नागपूर : ताप, सर्दी-पडसे असेल आणि तुमचे वय पन्नाशीवर असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष नको. कारण, स्वाईन फ्लूने आणखी दोन रुग्णांचे बळी घेतले असून मृतांची संख्या सहा झाली. हे सर्व रुग्ण पन्नाशी गाठलेले होते. 

मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात नुकतीच स्वाईन फ्लू आढावा बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, मेयोचे डॉ. रविंद्र खडसे, डॉ. अभिनव वानखेडे, जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद बीटपल्लीवार यांच्यासह खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी प्रमुख्याने उपस्थित होते.

-मृतांमध्ये मध्यप्रदेश व नागपुरातील रुग्ण

या बैठकीमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या दोन रुग्णांची माहिती ठेवून त्याचे विश्लेषण करण्यात आले. मध्यप्रदेशमधील रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे तज्ज्ञाने स्पष्ट केले. तर, दुसरा रुग्ण हा नागपुरातील होता. त्याला स्वाईन  फ्लूसोबतच हृदय रोग, संधीवात व थॅलेसेमीया या सहव्याधी असल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 

-१० संशयितांपैकी ६ मृत्यू

स्वाईन फ्लू संशयित १०  मृत्यूची प्रकरणे बैठकीत ठेवण्यात आली. यात जानेवारी ते आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांचे वय ५०व त्यापुढील होते. तीन महिला व तीन पुरुषांचा यात समावेश होता. 

-सहव्याधी असलेल्यांनी फ्लूकडे लक्ष द्या

 डॉ. गोवर्धन नवखरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, स्वाईन फ्लूचे आतापर्यंत सहा मृत्यू झाले तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु ज्यांचे वय ५० व त्यापुढील आहे, ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनी फ्लू सदृश्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिबंध करण्यासाठी इन्फल्युएंझां ए लसीकरणाच्या डोस घ्यावा. वैयक्तिक स्वस्छता जसे, वांरवार हात धुणे, सॅनीटायझरने हाथ निर्जतुंक करणे, खोकलताना, शिंकताना तोडावर रुमाल धरणे, वारंवार स्पर्श होणाºया वस्तु, जागा निंर्जतूक करणे, गर्दीत जाणे टाळणे व मास्क वापरणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यूnagpurनागपूर