‘स्वर्णजयंती’त दारूच्या दोन हजार बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:29 IST2017-09-15T00:29:07+5:302017-09-15T00:29:32+5:30

दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरूच असून गुरुवारी रात्री १२.४० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या ....

'Swarnjayanti' has two thousand bottles of liquor | ‘स्वर्णजयंती’त दारूच्या दोन हजार बाटल्या

‘स्वर्णजयंती’त दारूच्या दोन हजार बाटल्या

ठळक मुद्देआरपीएफने केल्या जप्त : चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरूच असून गुरुवारी रात्री १२.४० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून दारूच्या १ लाख ४० हजार १४० रुपये किमतीच्या २ हजार २ बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचा जवान संतोष पटेल, अर्जुन पाटोले यांना रेल्वेगाडी क्रमांक १२८०४ स्वर्णजयंती एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. याबाबतची सूचना त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. त्यांनी उपनिरीक्षक होतीलाल मिना, संतोष पटेल, अर्जुन पाटोले, विकास शर्मा, एच. पी. वासनिक यांची चमू गठित केली. स्वर्णजयंती एक्स्प्रेस रात्री १२.४० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. चमूने समोरील जनरल कोचची तपासणी केली असता त्यांना दोन महिला संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांनी आपली नावे सरिता संजय जाट (३६) दमापुरा चौक अशी सांगितली. संशयाच्या आधारे त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १ लाख ४० हजार १४० रुपये किमतीच्या २ हजार २ बाटल्या आढळल्या. पकडलेली दारूआणि महिलांना पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
लोहमार्ग पोलीस गाफिल
रेल्वेस्थानकावर दररोज रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने दारू पकडण्याची कारवाई करण्यात येत आहे. दारू पकडणे हे लोहमार्ग पोलिसांचे काम आहे. परंतु आपल्या कर्तव्याचा लोहमार्ग पोलिसांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. दारूच नाही तर रेल्वे सुरक्षा दलातर्फे मोबाईल चोरट्यांना पकडण्याच्याही सहा ते सात घटना घडल्या आहेत. यात लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Web Title: 'Swarnjayanti' has two thousand bottles of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.