शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्राध्यापक पती, डॉक्टर पत्नीचा मुला-मुलीसह संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:26 IST

प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहत्या करून आत्महत्या केल्याचा संशय : कोराडी परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर / कोराडी : प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राणे (४१), डॉ. सुषमा धीरज राणे (३९), ध्रुव धीरज राणे (११) आणि वन्या धीरज राणे (५) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोसायटी, ओमनगर, कोराडी नाका येथे राहत होते.

धीरज राणे वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोली, नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. घरी धीरज यांची आत्या प्रमिला (६५) त्यांच्यासोबत रहायच्या. भल्या सकाळी हे कुटुंब उठायचे. मंगळवारी सकाळी ९ वाजूनही भाचा, सून नातवांपैकी कुणीच बाहेर दिसत नसल्याने प्रमिला यांनी सुषमा यांना आवाज दिला. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही, असे सुषमा हिने सांगितले. त्यानंतर १ वाजता पुन्हा प्रमिला यांनी आवाज दिला. यावेळीसुद्धा सुषमा यांनी अजून झोप झाली नाही, असे सांगितले. १.३० च्या सुमारास प्रमिला यांना धीरजच्या रुमचे दार अर्धवट उघडे दिसल्याने त्या आतमध्ये गेल्या. धीरज, धुव्र आणि वन्न्या निपचित पडून होते तर, बाजूच्या रूममध्ये सुषमा गळफास लावून दिसल्याने प्रमिला या आरडाओरड करीत बाहेर आल्या. त्यांनी बाजूच्या किराणा दुकानदाराला हे सांगितले. नंतर स्वत:च्या मुलीला आणि सुषमा यांच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षातही फोन केला. नियंत्रण कक्षाने कोराडी पोलिसांना कळविले. त्यानुसार ठाणेदार वजीर शेख आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याचे कळल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त नीलोत्पल, गुन्हे शाखेची पथके तसेच ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमही पोहोचल्या.  धीरज, ध्रुव आणि वन्न्या या तिघांचे मृतदेह जेथे होते तेथे इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरींज आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या.एकूणच घटनाक्रमावरून राणे दाम्पत्यापैकी एकाने दोन मुलांसह तिघांची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.परिसरात उलटसुलट चर्चाया घटनेची वार्ता वायुवेगाने कोराडी आणि आजूबाजूच्या गावात पोहोचली. त्यामुळे मोठ्या संख्येत बघ्यांनी राणे दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी सिरींज आणि सुसाईड नोट सापडल्याचे सांगितले. यासंबंधाने जास्त माहिती देता येणार नाही, असे पोलीस अधिकारी म्हणाले. ऐन पोळ्याच्या दिवशी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर