शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

चरण नाईकवारचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

देवलापार : नागपूर येथे प्लंबरचे काम करणाऱ्या चरण नाईकवार (वय ३२) याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत ...

देवलापार : नागपूर येथे प्लंबरचे काम करणाऱ्या चरण नाईकवार (वय ३२) याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात चर्चेला पेव फुटले आहे. चरण हा मूळचा सीतापार (लोधा), ता. रामटेक येथील रहिवासी आहे. तो नागपूरला मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. चरणचा मृतदेह बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान कोठार (जि. सिवनी) येथील उड्डाणपुलाच्या खाली आढळून आला. त्याच्या गळ्यावर एक मोठी जखम असल्याचे बोलले जात आहे. चरण नाईकवार व त्याचा मित्र मंगलदास फागुराम गाडेकर (२७) हे राजीव नगर विश्वकर्मा मंदिराजवळ नागपूर येथे भाड्याने राहत होते. मंगलदास हा मूळचा सिवनी जिल्ह्यातील गंगेर्वा परिसरातील रहिवासी आहे. मंगलदासच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी आणण्यासाठी मंगलदास आणि चरण दोघेही सोमवारी रात्री १.३० वाजता मोटारसायकलने नागपूर येथून सिवनीकडे निघाले होते. मात्र, नागपूरवरून ८० किलोमीटर अंतरावरील कोठार नाल्याजवळील उड्डाणपुलाखाली चरण मृतावस्थेत दिसून आला. याबाबतची माहिती कुणीतरी त्याच्या कुटुंबीयांना दिली. चरणच्या मृत्यूसमयी मंगलदास कुठे होता हे कळू शकले नाही. कालांतराने तो घटनास्थळी पोहोचला असे सांगण्यात येत आहे. चरण याच्या पार्थिवावर सीतापार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चरण याच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासाअंती बाहेर येण्याची शक्यता आहे.