शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाज दिनेश टुलेचे भाजपशी नाते

By admin | Updated: April 23, 2015 02:40 IST

कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या तसेच मद्य व्यापाऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या ठगबाज दिनेश टुले याचे भाजपाच्या

जगदीश जोशी नागपूरकोट्यवधी रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या तसेच मद्य व्यापाऱ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या ठगबाज दिनेश टुले याचे भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. एकेकाळी तुरुंगाची हवा खाऊन आलेला टुले मंगळवारी नागपूर दौऱ्यावर आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत सावलीसारखा फिरत होता. दानवे यांच्यासोबत त्याने भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत ‘भरत मिलाप’देखील केला. या संबंधांमुळे भाजपात खळबळ माजली आहे. २००७ साली दिनेश टुले याने केलेली फसवणूक समोर आली होती. टुले नरखेडमधील भिष्णूर येथील रहिवासी आहे. पहिले तो राज्यातील एका मोठ्या मंत्र्याचा अगदी ‘खास’ होता. वडिलांनादेखील सोडले नाहीदिनेश टुले याने आपल्या वडिलांचीदेखील फसवणूक केली होती. कौटुंबिक शेतीचा त्याने एका व्यक्तीसोबत परस्पर सौदा केला. याची माहिती मिळताच त्याचे वडील गुणवंत टुले यांनी वाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल केला. शिक्षादेखील सुनावलीटुलेला मालेगाव येथील न्यायालयाने फसवणुकीच्या एका प्रकरणात एका महिन्याची कैद किंवा २० हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले होते. त्याने न्यायालयात दंड भरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याविरुद्ध जयस्वाल यांच्या आत्महत्येसह इतर प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. टुलेच्या प्रभावामुळे त्याला ‘तारीख पे तारीख’ मिळते आहे