दहिसर येथील शुक्ला कंपाऊंडमधील कारवाईला स्थगिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
By आनंद डेकाटे | Updated: December 10, 2025 17:39 IST2025-12-10T17:39:16+5:302025-12-10T17:39:16+5:30
अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ६० दिवसात चौकशी

दहिसर येथील शुक्ला कंपाऊंडमधील कारवाईला स्थगिती; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दहिसरमधील शुक्ला कंपाऊंड येथे झालेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली. आता येथील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली ६० दिवसात चौकशी करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नगरविकास विभागातफें दिली.
सामंत म्हणाले, संबंधित भूखंडावरील ५५ व्यावसायीक गाळे व २० निवासी घरे असे एकूण ७५ बांधकामांना निष्कासनाची नोटीस दिलीी. ७५ पैकी ५१ बांधकामांशी पक्षकारांनी मनपाने दिलेल्या नोटीसला न्यायालयात दावे दाखल केले. या दाव्यापैकी १० दावे फेटाळण्या आले असून उर्वरत ३२ न्यायप्रविष्ठ आहेत. आता यासंदर्भात कुठलीही कारवाई होणार नाही, असे जाहीर करीत येथे पागडी सिस्टम लागू होतील का, याद्ष्टीनेही तपासणी केली जइंल. तसेच कारवाईवेळी विकासकाने बाऊंसर लावून दहशत निर्माण केली का, याचीही चौकशी होईल असे सांगितले.
आमदार प्रकाश सुवे यांनी झोपडपट्टी तोडा असे आदेश नव्हते याकडे लक्ष वेधत १९९५ पुवींच्या झोपडपट्टया असताना घरावर कारवाई करण्यात आली. ही झोपडपट्टी डीम्ड स्लम घोषीत आहे, याकडे लक्ष वेधले. आमदार मनीषा चौधरी यांनी या भागासाठी पाागडी कायदा लागू करा असा आग्रह धरला. भास्कर जाधव यांनी घरे तोडलेल्यांचे पुनर्वसन करणार का, अशी विचारणा केली. यावर या सर्व बाबतीत सकारात्मक विचार केला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
कसबापेठ टनेल, मुख्यमंत्री घेणार बैठक
कसबा पेठ येथील स्वारगेट ते शनिवारवाडा येथे तीन भुयारी मार्ग तयार करून वाहतूक् कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. आमदार हेमंत रासने यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. यासंदर्भात यापुवीं मुख्यमंत्र्यांनी यशदा येथेबैठक घेतली. त्यावेळी डीपीआर मास्टर प्लान तयार करावे अशी सूचना देण्यात आली. मनपाने ते करावे असे ठरले. त्यानंतर मनपाने पीडब्लूडीला पत्र लिहून् त्यांनी मास्टर प्लान करावे अशी सूचना केली. पुणे मनपा व पीडब्लूडी यांच्यात संभ्रम निर्माण झाला. मुख्यमंत्र्यानी यासंदर्भात चर्चा करून, येत्या १५ दिवसातस्वत: बैठक घेत मार्ग काढतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.