शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  विनयभंगाचा आरोपी पीएसआय निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:31 IST

महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.२१ मे रोजी नवीन बाभुळखेडा येथे एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास टेमगिरी करीत होते. टेमगिरीला या प्रकरणातील तक्रारकर्त्यांचे बयाण नोंदवायचे होते. तक्रारकर्ता मेडिकलमध्ये भर्ती असल्याने टेमगिरेने त्याच्या बहिणीशी संपर्क केला. त्यांनी २७ मे ते १३ जून दरम्यान तक्रारकर्त्यांच्या बहिणीशी चर्चा केली. यादरम्यान ते तक्रारकर्त्याच्या बहिणीला ठाण्यात बोलावू लागले. तिला रात्री उशिरापर्यंत ठाण्यात बसवून ठेवायचे. १३ जून रोजी तिला चित्रपट पाहण्यासाठी सोबत चालण्यास सांगितले. तिला व्हॉट्सअ‍ॅपवर चित्रपटाचे तिकीटही पाठवले. महिलेने याची डीसीपी राजतिलक रौशन यांचच्याकडे तक्रार केली. प्रकरण गंभीर असल्याने रौशन यांनी बेलतरोडी पोलिसांकडून याची चौकशी केली. तक्रारकर्त्यासोबत झालेल्या बोलण्यातून टेमगिरी दोषी असल्याचे आढळून आले. याआधारावर १५ जून रोजी टेमगिरे यांच्याविरुद्ध अजनी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून टेमगिरे गायब आहे. त्याचा फोनही स्वीच ऑफ आहे. तपासादम्यान बेलतरोडी पोलिसांनी टेमगिरेविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. रौशनने पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची विशेष रिपोर्ट पाठवला होता. त्या आधारावर त्याला बुधवारी निलंबित करण्यात आले. या प्रकरणामुळे अजनी ठाण्यात खळबळ उडाली आहे. अधिकारीही आश्चर्यचकित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, टेमगिरे जिथे बसत होते तिथे महिला अधिकारीही उपस्थित राहत होत्या. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, टेमगिरेने तिला पाठवलेले चित्रपटाचे तिकीट ठाण्यामध्येच तिच्या मोबाईलमधून डिलीट सुद्धा करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसsuspensionनिलंबनMolestationविनयभंग