हृदयघात झालेल्या रुग्णाचे असे वाचवू शकता प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:48 IST2018-02-09T22:44:37+5:302018-02-09T22:48:27+5:30
हृदयरोगींना हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) कुठेही आणि कुठल्याही क्षणी येऊ शकतो. रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाल्यास त्या रुग्णाचे प्राणही जाण्याचा धोका असतो. अशावेळी रुग्णालयाचे पथक येईपर्यंत एखाद्या जाणकाराने प्रथमोपचार दिल्यास त्या रुग्णाचे प्राण वाचविले जाऊ शकतात. म्हणूनच मेघे ग्रुपच्या एडीसीसी अकॅडमीतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी हार्ट सेव्हर आणि बेसिक फर्स्ट एड (प्रथमोपचार) च्या प्रशिक्षणाची कार्यशाळा शुक्रवारी आयोजित करण्यात आली.

हृदयघात झालेल्या रुग्णाचे असे वाचवू शकता प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हृदयरोगींना हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) कुठेही आणि कुठल्याही क्षणी येऊ शकतो. रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाल्यास त्या रुग्णाचे प्राणही जाण्याचा धोका असतो. अशावेळी रुग्णालयाचे पथक येईपर्यंत एखाद्या जाणकाराने प्रथमोपचार दिल्यास त्या रुग्णाचे प्राण वाचविले जाऊ शकतात. म्हणूनच मेघे ग्रुपच्या एडीसीसी अकॅडमीतर्फे माध्यम प्रतिनिधींसाठी हार्ट सेव्हर आणि बेसिक फर्स्ट एड (प्रथमोपचार) च्या प्रशिक्षणाची कार्यशाळा शुक्रवारी आयोजित करण्यात आली.
एडीसीसीसह अमेरिकन हार्ट असोसिएशनअंतर्गत कार्यरत इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर (आयटीसी) व जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, सावंगी यांच्या संयुक्त विद्यामाने स्कूल आॅफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊट येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. स्कूल आॅफ व्हर्च्युअल लर्निंगचे संचालक डॉ. सुनील निकोसे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे सीईओ डॉ. संदीप श्रीवास्तव, आयटीसीचे डॉ. वीरेंद्र बेलेकर, स्कूल आॅफ डिस्टन्स लर्निंगच्या संचालिका डॉ. अंजली बोरले, एडीसीसी अकॅडमीचे प्रमुख डॉ. बी. इबेनेझर यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रथमोपचाराचे व जीवन सुरक्षेचे प्रशिक्षण दिले. बाजार, मॉल, बस, ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा रस्त्यावर आपल्या सोबतच्या किंवा अनोळखी व्यक्तीला हृदयघाताचा धक्का आल्यास आपल्याकडे प्रथमोपचार देण्याचे कौशल्य असले पाहिजे. त्यासाठी योग्य पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. हृदयघात झालेल्या व्यक्तीला प्रथम तपासणे, त्यानंतर त्याला पालथा झोपवून छातीच्या मध्यभागी पम्प करणे व कृत्रिम श्वास देणे आवश्यक आहे. तीनदा पम्प व दोनदा कृत्रिम श्वास, ही क्रिया दोन मिनिटात पाच वेळा करावी. अशावेळी एईडी मशीन असल्यास त्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. रुग्णालयाचे पथक दाखल होईपर्यंत ही क्रिया केल्यास संबंधित रुग्णाचे प्राण वाचविले जाउ शकतील, असा विश्वास डॉ. निकोसे यांनी यावेळी दिला. कार्यशाळेत लोकमतसह इतर माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी एडीसीसीचे विशाल जग्यासी, पारुल देशभ्रतार, डॉ. सुनील लोंढे, कोरेना परेरा आदींनी सहकार्य केले.