शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

'महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:11 IST

Nagpur : संविधान सत्याग्रह पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम खडकीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सुरु नागपूरच्या दीक्षाभूमीपासून झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बुटीबोरी येथून सकाळी ६.३० वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. दुपारी सावंगी येथे विश्रांती घेण्यात आली व रात्रीचा मुक्काम खडकीला करण्यात आला. या पदयात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, माजी मंत्री वसंत पुरके, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोयर, सरचिटणीस कुंदा राऊत, मुजीब पठाण, संदेश सिंगलकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

यावेळी सपकाळ म्हणाले, आज भाजपा सत्तेत आला आहे पण महात्मा गांधी नावाचा संत भाजपा व आरएसएसच्या मानगुटीवर बसलेला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आलेला असून भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्वीकारावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. पण रा. स्व. संघाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गांधी भजन व देशभक्तीची गाणी 

पदयात्रेत म. गांधी यांची भजने व देशभक्तीची गाणी वाजविण्यात आली. यात्रेत सहभागी प्रत्येक जण भारत माता की जय, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देत होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : RSS embracing Gandhi is ideological defeat, says Congress leader Sapkal.

Web Summary : Congress leader Harshvardhan Sapkal criticized RSS for embracing Mahatma Gandhi, calling it an ideological defeat. He spoke during the 'Constitution Satyagraha Padayatra' from Nagpur, emphasizing Gandhi's principles versus RSS ideology. The march included Gandhi's great-grandson and others.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसMahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर