शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

आश्चर्य : बंद पडलेल्या शाळेची आरटीईत नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:29 IST

शासनातर्फे गरीब मुलांना नामांकित शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई सुरू करण्यात आले. यात शाळांनी नोंदणी केल्यानंतर २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत. त्याचा मोबदला शासन शाळांना देणार आहे. पण यात आता बंद पडलेल्या शाळांचीही नोंदणी झाली आहे आणि या शाळेत लॉटरीच्या सोडतीत बालकांची निवड झाली आहे. पालक जेव्हा बालकांना घेऊन शाळेत प्रवेशाला गेले. तेव्हा बंद पडलेल्या शाळेच्या शटरला बकऱ्या बांधलेल्या होत्या. पालकांनी यासाठी शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देलॉटरीच्या सोडतीत विद्यार्थ्यांची निवड : शिक्षण विभागावर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनातर्फे गरीब मुलांना नामांकित शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई सुरू करण्यात आले. यात शाळांनी नोंदणी केल्यानंतर २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत. त्याचा मोबदला शासन शाळांना देणार आहे. पण यात आता बंद पडलेल्या शाळांचीही नोंदणी झाली आहे आणि या शाळेत लॉटरीच्या सोडतीत बालकांची निवड झाली आहे. पालक जेव्हा बालकांना घेऊन शाळेत प्रवेशाला गेले. तेव्हा बंद पडलेल्या शाळेच्या शटरला बकऱ्या बांधलेल्या होत्या. पालकांनी यासाठी शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला आहे.आरटीईची अंतर्गत शाळांची नोंदणी करताना शाळेची चौकशी करण्यात येते. यु-डायस, सरलअंतर्गत दिलेली माहिती आदी तपासली जाते. त्यानंतर शाळेची आरटीईमध्ये नोंद केली जाते. हंसापुरी, नालसाहब चौक येथील एस.आय. कॉन्व्हेंट ही शाळा दोन वर्षापासून बंद आहे. पण २०१९-२० या शैक्षणिक वर्षात आरटीईमध्ये १९ एनजीओ ३८८९ या क्रमांकाने नोंदणीकृत आहे. या बंद पडलेल्या शाळेत आदीबा खान या बालिकेची लॉटरीच्या सोडतीत निवड झाली. पालक शाळेमध्ये विचारणा करण्यास गेल्यावर शाळेचे शटर बंद होते आणि त्याला बकºया बांधलेल्या होत्या. पालकांनी लगेच आरटीई व्हेरीफिकेशन कमिटीकडे याची तक्रार केली. कमिटीच्या सदस्यांनी शाळेला भेट देऊन परिसरात विचारणा केली असता, ही शाळा गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याचे लोकांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.अ‍ॅक्टीव्हीटी फी च्या नावाने पैशाची मागणीनंदनवनमधील स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलमध्ये आरटीईमध्ये प्रवेशाच्या पूर्वीच पालकांना अ‍ॅक्टीव्हीटी फीच्या नावावर पालकांना २००० रुपयांची मागणी केली आहे. यासंदर्भातही तक्रार आरटीई व्हेरीफिकेशन समितीच्या सदस्यांकडे आली आहे. आरटीईच्या नियमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांकडून कुठलेही शुल्क वापरता येत नाही.बंद पडलेल्या शाळेची आरटीईत नोंद होणे, ही बाब शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेणारी आहे. तसेच पालकांकडून विविध उपक्रमांतर्गत पैसे वसूल करणेही नियमबाह्य असून, प्रशासनाने शाळेवर कारवाई करणे गरजेचे आहे.मो. शाहीद शरीफ, सदस्य, आरटीई व्हेरीफिकेशन कमिटी

 

टॅग्स :SchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा