Coronavirus in Nagpur; बहिणीला वाचवू न शकल्याचे शल्य; बाबा मेंढे पुरवित आहेत नि:शुल्क ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 08:15 IST2021-04-27T08:15:00+5:302021-04-27T08:15:02+5:30

Coronavirus in Nagpur कोरोना संक्रमणामुळे ऑक्सिजनअभावी वाचवू न शकलेल्या मोठ्या बहिणीचे शल्य बाबा मेंढे यांना कायम राहणार आहे. हे शल्य तर कधीच कमी होणार नाही. मात्र, त्या वेदनेची धार कमी करण्यासाठी मेंढे यांनी इतर गरजू लोकांना स्व:खर्चातून ऑक्सिजन पुरविण्याचा विडा उचलला आहे.

Surgery to save sister; Baba Mendhe is providing free oxygen concentrator | Coronavirus in Nagpur; बहिणीला वाचवू न शकल्याचे शल्य; बाबा मेंढे पुरवित आहेत नि:शुल्क ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर

Coronavirus in Nagpur; बहिणीला वाचवू न शकल्याचे शल्य; बाबा मेंढे पुरवित आहेत नि:शुल्क ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर

ठळक मुद्दे इतरांनाही करताहेत सहकार्याचे आवाहन

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे ऑक्सिजनअभावी वाचवू न शकलेल्या मोठ्या बहिणीचे शल्य बाबा मेंढे यांना कायम राहणार आहे. हे शल्य तर कधीच कमी होणार नाही. मात्र, त्या वेदनेची धार कमी करण्यासाठी मेंढे यांनी इतर गरजू लोकांना स्व:खर्चातून ऑक्सिजन पुरविण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ते इतरांना आवाहन करत आहेत.

१५ दिवसांआधी मोठ्या बहिणीला कोरोना संक्रमणाचे निदान उशिरा झाल्याने आणि ऑक्सिजनसाठी धावाधाव करण्याच्या नादात बहिणीचा जीव वाचवू शकले नाही. कसेतरी ३०-३२ हजार रुपये मूळ किंमत असलेले ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर ७० हजारांना मिळवले. मात्र, एक दिवस उपयोग होऊन दुसऱ्या दिवशी बहिणीला जीव गमवावा लागला. या वेदनेत असतानाच आपल्या बहिणीसारखा दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून स्वत:जवळ असलेले एक ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आणि इतरांकडे उपयोग झाल्यानंतर उरलेले तीन कन्सन्ट्रेटर मिळवून ते ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत नि:शुल्क पुरविण्याचे काम बाबा मेंढे यांनी तात्काळ सुरू केले. याचा लाभ आज अनेक गरजूंना होत आहे. मात्र, दररोज शेकडो फोन येतात. त्या प्रत्येकापर्यंत ते पोहोचवता येत नसल्याची खंत त्यांना आहे.

ज्यांच्याकडे असेल त्यांनी द्यावे

ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित ठेवण्यासाठी हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर उपयोग पडते. शहरात बहुतांश लोकांकडे कोरोना संक्रमणात हे कन्सन्ट्रेटर आहेत. त्यांच्याकडील उपयोग झाल्यावर ते तसेच पडून राहणार आहेत. अशा स्थितीत ते रिकामे पडून राहण्यापेक्षा गरजूंच्या उपयोगात पडावे, यासाठी त्यांनी ते कन्सन्ट्रेटर द्यावे. जेणेकरून अनेकांचा जीव वाचवता येईल, असे आवाहन बाबा मेंढे यांनी केले आहे.

चार्जरने होते चार्ज

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर इलेक्ट्रिकद्वारे चार्ज होते. ते सिलिंडरप्रमाणे रिफिल करावे लागत नाही. ९३ ते ९० या मात्रेत ऑक्सिजनची पातळी असणाऱ्यांचे ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यास हे कन्सन्ट्रेटर उपयोगी पडते.

.............

Web Title: Surgery to save sister; Baba Mendhe is providing free oxygen concentrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.