शेतकरी आंदोलनास पाठिंबा; सोमवारी बंदचे आवाहन
By Admin | Updated: June 4, 2017 18:13 IST2017-06-04T18:13:41+5:302017-06-04T18:13:41+5:30
शेतकरी संपाला पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या धोरणाविरोधात सोमवारी बंदचे आवाहन क रण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनास पाठिंबा; सोमवारी बंदचे आवाहन
अमरावती :
शेतकरी संपाला पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या
धोरणाविरोधात सोमवारी बंदचे आवाहन क रण्यात आले आहे.
परतवाडा येथे रविवारी येथील जयस्तंभ चौकावर सकाळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शासनाचा निषेध व शेतकरी आंदोलनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन म्हणीत समर्थन दिले. सोबतच सोमवारी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
वरूड येथे पांढूर्णा चौकात शेतकऱ्यांनी आंदोलन करीत भाजीपाला फेकला. एका दुग्धपदार्थांच्या कंपनीत जाणारा टँकर अडवून त्यातील हजारो लीटर दूध फेकण्यात आले. स्वाभामानी युवा शेतकरी संघटनेचे विदर्भअध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भूयार यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत शेतकरी संपाला पाठींबा दिला. सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
चांदूर बाजार तालुक्यात सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेत बंद पाळण्यताचे आवाहन केले आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती समिती स्थापित करून ुबंद यशस्वी करण्यासाठी प्रथमच चांदूर बाजार येथील स्थानिक नेते एकत्र आले आहेत. या बंदला यशस्वी करण्याचे आवाहन करण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध दुकानदारांना व प्रतिष्ठाणांच्या मालकांना भेटी दिल्या आहेत.
दर्यापुरात किसान क्रांती मोर्चाच्यावतीने बंदचे आवाहन केले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.