शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

अवयव दानाच्या सुविधांची मेडिकलमध्ये पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:01 AM

उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ट्रस्टच्यावतीने मंगळवारी मेडिकलची पाहणी करण्यात आली. यावेळी सोई व समस्यांची माहिती घेण्यात आली असून या संदर्भातील अहवाल लवकरच शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र पायाभूत सोईंची गरज : शासनाच्यावतीने मोहन फाऊंडेशनने जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ट्रस्टच्यावतीने मंगळवारी मेडिकलची पाहणी करण्यात आली. यावेळी सोई व समस्यांची माहिती घेण्यात आली असून या संदर्भातील अहवाल लवकरच शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे.आॅस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्याविषयी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आज त्यांच्याकडे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात सर्वसामान्यांमध्ये अवयवदानाविषयीची उदासीनता, गैरसमज आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सोईंच्या अभावांमुळे ‘ब्रेन डेड’ रुग्ण उपलब्ध असतानाही अवयवदान होत नसल्याची शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, ‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायदा १९९४ नुसार प्रत्येक ब्रेन डेड व्यक्तीची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ ने (झेडटीसीसी) देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात फार कमी माहिती या समितीला दिली जात आहे. यामुळे गेल्या सहा वर्षात केवळ ३० ‘ब्रेन डेड’ दात्याकडून अवयवदान होऊ शकले. हीच स्थिती थोड्या अधिक फरकाने इतर मेडिकलची आहे. अवयवदानाचा आकडा वाढण्यासाठी काय आवश्यक उपाययोजना करावायच्या आहेत व कुठल्या समस्या येत आहेत याची पाहणी करण्यासाठी मोहन फाऊंडेशन व टाटा ट्रस्टची चमू प्रत्येक मेडिकलला भेट देणार आहे. त्यानुसार मोहन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक अमित शेनॉय यांनी मंगळवारी मेडिकलची पाहणी केली. यात ट्रॉमा केअर सेंटर, मेडिकलचे अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया गृह व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मूत्रपिंड प्रत्यारोपण विभागाची पाहणी केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशीही चर्चा केली. यात प्राथमिक स्तरावर अवयवदान वाढीसाठी स्वतंत्र पायाभूत सोईंची गरज असल्याचे समोर आले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयOrgan donationअवयव दान