सुपर जाम !
By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:49+5:302016-03-16T08:39:49+5:30
नागपुरात क्रिकेटचा सामना आणि वाहतुकीचा जाम हे समीकरणच झाले आहे. यावेळीही वर्धा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सुपर जाम !
नागपुरात क्रिकेटचा सामना आणि वाहतुकीचा जाम हे समीकरणच झाले आहे. यावेळीही वर्धा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागपुरात होणारा सामना बघण्यासाठी विदर्भच नाही तर मध्य प्रदेश व छत्तीसगड येथूनही मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी येतात. जामठी स्टेडियमकडे जाणारा एकच मार्ग असल्याने वाहतूक खोळंबण्याचा प्रकार टाळता येत नाही. मंगळवारी सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमपासून खापरीपर्यंत वर्धा रोडचा एक मार्ग चारचाकी वाहनांनी खचाखच भरला होता. स्टेडियमकडे वाहनांचा येण्याचा वेग दुपारी ४ पासून चांगलाच वाढला होता. एकाच वेळी एवढ्या वाहनांचे नियोजन करणे शक्य नसल्याने सामना सुरू झाल्यानंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर दिसत होत्या. याचा फटका अनेक क्रिकेटप्रेमींना बसला. अनेकांनी हॉटेल, रस्त्याच्या कडेला मिळेल तिथे वाहने पार्क करून स्टेडियमकडे पायीच वारी काढली. मात्र शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसेस यामध्ये अडकल्या होत्या. नोकरदार वर्गही वाहतूक जाममुळे घरी उशिराच पोहचला. एवढा मोठा जाम लागल्यानंतरही संताप, तणाव जाणवला नाही. पोलिसांनाही त्याची फारशी डोकेदुखी झाली नाही. अनेकजण वाहनातूनच क्रिकेटचा आनंद लुटत होते.