शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सुनिल केदारांची अडचण वाढणार; गुन्ह्याच्या कलमात वाढ!

By योगेश पांडे | Updated: January 11, 2024 23:23 IST

पोलिस न्यायालयाला अहवाल देणार : विनापरवानगी रॅलीतील दहाहून अधिक वाहने जप्त; इतर वाहनचालकांचा शोध सुरू

नागपूर : जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यावर पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढणे काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना महागात पडणार असल्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात केदार व इतर आरोपींविरोधात आणखी एक गुन्ह्याचे कलम वाढविले आहे. त्याचप्रमाणे रॅलीत सहभागी झालेली दहाहून अधिक चारचाकी वाहने जप्त केली असून, इतर वाहनचालकांचा शोध सुरू आहे. आता पोलिसांकडून या प्रकाराचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे केदार यांना विविध कडक अटींसह हायकोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता. बुधवारी दुपारी कारागृहातून बाहेर पडल्यावर केदार यांनी समर्थकांसह शहरात शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर मोठ्या कार होत्या व त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील निर्माण झाली होती. पोलिसांनी अगोदरच केदार समर्थकांना गर्दी करू नये, अशी सूचना देण्यात आली होती. तरीदेखील रॅली काढण्यात आली. पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेत केदार यांच्यासह जि. प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, रवींद्र चिखले, जि. प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि. प. सभापती अवंतिका लेकुरवाळे, अनिल राय, संजय मेश्राम आणि विष्णू कोकड्डे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. 

सुरुवातीला यात भादंविच्या कलम ३४१, १४३, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५, मोटार वाहन कायदा कलम १८४, १९४ आणि १७७ या कलमांचा समावेश होता. मात्र, त्यात कलम ‘१५३-अ’चा देखील समावेश करण्यात आला. धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा आदींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सामाजिक सलोखा बिघडवणे अशा प्रकरणात हे कलम लावण्यात येते. संबंधित कलमांतर्गातील गुन्हा अजामीनपात्र आहे. त्याची धंतोली पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता केदार यांना पोलिस परत ताब्यात घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तपास करून न्यायालयाला कळविणारपरवानगी नाकारली असतानादेखील रॅली काढणे, कारागृहाच्या संवेदनशील भागात घोषणाबाजी करणे, वाहतुकीची कोंडी निर्माण करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडविण्याचा आरोप केदार व त्यांच्या समर्थकांवर लागले आहेत. आता पोलिसांकडून यासंदर्भात कुठली पावले उचलण्यात येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यावर याचा विस्तृत अहवाल न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिली.

गुन्हेगारांची वाहने किती?५० पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात दाखल झालेल्या केदार यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी रॅली रोखून घोषणाबाजी करत वाहतूक विस्कळीत केली. कारागृहातून संविधान चौकात पोहोचत असताना वर्धा रोडवर सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना अनेक वाहनांचे क्रमांक मिळाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १० ते १२ कार जप्त केल्या आहेत. तर आणखी १० कार तसेच त्यांच्या चालकांचा शोध सुरू आहे. या वाहनांच्या कागदपत्रांची तसेच मालकांची तपासणी करण्यात येत आहे. यात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींची काही वाहने होती का, याची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार