सुनेला निर्दोष सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST2021-01-02T04:09:37+5:302021-01-02T04:09:37+5:30

प्रतिभा गणेश पांडे (३३) असे आरोपीचे नाव असून ती गाडेगाव खुर्द, ता. जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. मयताचे नाव ...

Sune was acquitted | सुनेला निर्दोष सोडले

सुनेला निर्दोष सोडले

प्रतिभा गणेश पांडे (३३) असे आरोपीचे नाव असून ती गाडेगाव खुर्द, ता. जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. मयताचे नाव शेवंताबाई होते. सदर घटना ९ सप्टेंबर २०१६ रोजी घडली. शेवंताबाईचा भाऊ घरी आला असता दाराला बाहेरून कुलूप लावले होते. आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडून आत प्रवेश केल्यानंतर शेवंताबाई मृतावस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर प्राणघातक वार करण्यात आला होता. २८ ऑगस्ट २०१९ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकारला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला व आरोपीचे अपील मंजूर करून तिला निर्दोष सोडण्यास सांगितले.

Web Title: Sune was acquitted