शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुमित ठाकूरविरुद्ध मकोका

By admin | Updated: January 23, 2016 03:06 IST

शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर व त्याच्या गँगविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह मकोका अंतर्गत विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.

फ्रेण्ड्स कॉलनीतील प्राध्यापकाला मारहाण प्रकरण : न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नागपूर : शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर व त्याच्या गँगविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह मकोका अंतर्गत विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. आरोपी सुमित ठाकूरने गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी फ्रेण्ड्स कॉलनी प्रेरणानगर येथील प्राध्यापक मल्हार मस्के यांच्या घरासमोर ठेवलेल्या त्यांच्या कारला धडक देऊन नुकसान केले होते. याबाबत त्यांनी त्याला जाब विचारला असता आपल्या साथीदराला आणून मस्के यांना जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडाच्या रॉडने व दांड्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या घरांच्या खिडकीचे काच आणि सामानांची तोडफोड करीत चार लाखाचे नुकसान केले होते. आरोपींमध्ये सुमित ठाकूर (३०), त्याचा भाऊ अमित ठाकूर, राजकुमार ठाकूर, विनयकुमार राजेंद्र प्रसाद पांडे, शेख शहनवाज ऊर्फ शानू शेख अमिन (मोमिनपुरा), मो. अलमिजान कुरेशी, शेख शहबाज ऊर्फ पप्पू शेख मुबारक, योगेश विनोदकुमार सिंह, नीलेश अशोक उके, मनोज प्रकाश शिंदे, अतुल रुपराव शिरभाते याचा समावेश आहे. यापैकी सुमित, अमित, योगेश सिंह आणि मनोज हे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठीत आहेत तर आरोपी राजकुमार, विनयकुमार, नीलेश आणि अतुलच्या विरुद्ध मकोका न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. हे चारही आरोपी फरार आहेत. तर शेख शहनवाज, मो. अलमीजान, शेख शहबाज याच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालयाला अहवाल सादर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)