सुमीत ठाकूरसह तिघांचे जामीन अर्ज फेटाळले
By Admin | Updated: August 18, 2016 02:14 IST2016-08-18T02:14:18+5:302016-08-18T02:14:18+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार सुमीत राजकुमार ठाकूर याच्यासह तीन जणांचे जामीन अर्ज ...

सुमीत ठाकूरसह तिघांचे जामीन अर्ज फेटाळले
मकोका न्यायालयाचा आदेश
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार सुमीत राजकुमार ठाकूर याच्यासह तीन जणांचे जामीन अर्ज महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले.
अन्य आरोपींमध्ये अमित राजकुमार ठाकूर रा. प्रेरणा कॉलनी आकारनगर आणि योगेश विनोदकुमार सिंग रा. फ्रेण्डस् कॉलनी यांचा समावेश आहे.
सुमीत ठाकूर आणि टोळीने १६ सप्टेंबर २०१५ रोजी एका प्राध्यापकावर हल्ला केला होता. कार जाळून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी सुमीत ठाकूर, अमित ठाकूर, राजकुमार ठाकूर, मनोज शिंदे, योगेश सिंग, विनायक पांडे, नीलेश उईके, अतुल शिरभाते यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपींपैकी नीलेश उईके आणि अतुल शिरभाते हे फरार आहेत.
आरोपींपैकी सुमीत, अमित आणि योगेश यांनी जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालताने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)