नागपुरातील माॅलमधील बाथरूममध्ये विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 20:15 IST2022-01-01T19:38:39+5:302022-01-01T20:15:17+5:30
Nagpur News रामदासपेठमधील बिग बाजारच्या माॅलमध्ये असलेल्या बाथरूममध्ये विषारी द्रव्य प्राषन करून राघवेश यशवंत मेश्राम (५०) या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नागपुरातील माॅलमधील बाथरूममध्ये विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या
नागपूर : रामदासपेठमधील बिग बाजारच्या माॅलमध्ये असलेल्या बाथरूममध्ये विषारी द्रव्य प्राषन करून राघवेश यशवंत मेश्राम (५०) या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ डिसेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दयानंदनगर जरीपटका येथे राहणारे राघवेश मेश्राम यांनी मॉलच्या सहावा माळ्यावरील बाथरूममध्ये जाऊन विषारी द्रव्य प्राषन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिक ठाकरे (६१, योगेश्वरनगर) यांनी दिलेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.