तरुणीची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST2021-03-27T04:08:51+5:302021-03-27T04:08:51+5:30
कळमेश्वर : तरुणीने तिच्या राहत्या घरी कुणीही नसताना गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुरझरी ...

तरुणीची गळफास लावून आत्महत्या
कळमेश्वर : तरुणीने तिच्या राहत्या घरी कुणीही नसताना गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुरझरी येथे बुधवारी (दि. २४) दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.
पूजा शंकर नेऊल (२९, रा. माहुरझरी, ता. कळमेश्वर) असे मृत तरुणीचे नाव आहे. घरातील मंडळी शेतात कामाला गेल्याने घरी कुणीही नव्हते. त्यातच तिने घरातील छताच्या हुकला दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच तिचे वडील शंकर यांनी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार राजेश वानखेडे करीत आहेत.