नागपूरचे ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:36 IST2018-01-09T21:29:23+5:302018-01-09T21:36:04+5:30
ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे.

नागपूरचे ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेट
ठळक मुद्देजगातील सात कवींमधून निवड
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना जागतिक डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक कला आणि संस्कृती अकादमीतर्फे ३५ राष्ट्रातील ४०० कवींची जागतिक कवी परिषद मंगोलिया येथील उलानबत्तर या शहरात पार पडली. या परिषदेने ‘आॅनररी डी.लिट. इन लिटरेचर’ या मानद डॉक्टरेटसाठी जगातील सात कवींची निवड केली. यात मराठीतून सुधाकर गायधनी यांना निवडण्यात आले. या परिषदेने गायधनी यांना मानद डॉक्टरेटसह पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.