शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:43 IST

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते.

नागपूर/मुंबई - नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. येथे २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी प्रमुख उमेदवार व नेत्यांनी विजयाबद्दल दावे केले होते. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले होते. हॅट्ट्रीकपूर्वीच नागो गाणार यांची विकेट पडली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहित दिली. 

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी ७:३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात आल्या. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ देण्यात आली होती. सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या नागपूर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाली आहेत.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका बसला, अशा शब्दात भाजपवर टीकाही केली. 

अशी झाली मतमोजणी

दरम्यान, येथील एकूण २८ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली होती. उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर, उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूरElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी