शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोटांची अशीही ‘बंडल’बाजी

By admin | Updated: April 3, 2017 02:47 IST

साधारणत: बँकेतून नोटांचे बंडल मिळाल्यानंतर कुणीही त्या एका कडेने मोजून घेतात. मात्र जर घरी आल्यावर

चांगल्या नोटांना चिटकवल्या फाटक्या नोटा : बँकेमधून मिळाले ‘बंडल’ राजेश टिकले   नागपूर साधारणत: बँकेतून नोटांचे बंडल मिळाल्यानंतर कुणीही त्या एका कडेने मोजून घेतात. मात्र जर घरी आल्यावर मोजलेल्या नोटा आणि प्रत्यक्षातील नोटांची संख्या यात मोठा फरक असला तर, नक्कीच कुणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. असाच धक्का नागपुरातील एका नागरिकाला बसला असून त्यांनी बँकेतून काढलेल्या ‘बंडल’मधील अनेक नोटा फाटक्या आहेत. विशेष म्हणजे ‘बंडल’ मोजताना भल्याभल्यांनादेखील संशय येणार नाही इतक्या बेमालूमपणे जोडल्या आहेत. हा प्रकार इतरही अनेक नागरिकांसोबत घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जयताळा रोड येथील रहिवासी किशोर मेश्राम यांनी सुमारे महिन्याभरापूर्वी दोन वेगवेगळ्या बँकांमधील खात्यातून प्रत्येकी २४ हजार रुपये काढले. यात एका राष्ट्रीयीकृत व एका सहकारी बँकेचा समावेश होता. काढलेल्या पैशांमध्ये १०० रुपयांच्या २ ‘बंडल’चा समावेश होता. आवश्यकतेनुसार त्यांनी काढलेले पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. मागील आठवड्यात भाजी व किराणा खरेदीसाठी १०० च्या एका ‘बंडल’मधील पैसे त्यांनी पत्नीला दिले. त्यांनी २६०० रुपये मोजून दिले होते. मात्र दुकानदाराने दुसऱ्या बाजूने नोटा मोजल्या असता त्या १३०० रुपयांच्याच होत्या. दुकानदाराने उर्वरित पैशांची मागणी केली, मात्र आपण तर पूर्ण पैसे दिल्याचा दावा मेश्राम यांनी केला. इतरांनाही बसू शकतो फटका याबाबत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारणा केली असता गोपनीयतेच्या अटीवर त्यांनी असा प्रकार बँकेतून शक्य नसल्याचे सांगितले. एखाद्या व्यक्तीने हे ‘बंडल’ बँकेत जमा केले असेल. नोटा मोजण्याच्या मशीनमध्ये १०० नोटा दाखविण्यात आल्या असतील व त्याच्या खात्यात तितकी रक्कम जमा झाली असेल. या नोटा बँकेत तपासण्यात आल्या नसतील व दुसऱ्या एखाद्या ग्राहकाला हे ‘बंडल’ देण्यात आले असेल. त्यातून हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. मात्र संबंधित प्रकार हा गंभीर असून इतरांनाही असा फटका बसू शकतो, असे त्यांनी सांगितले. हे तर नोटांचे ‘मॅजिक’च या नोटा ज्या कुणी जोडल्या आहेत, त्या जाणूनबुजून समोरच्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्याच इराद्याने लावल्या आहेत. तीन फाटके तुकडे एकत्र करून काही नोटा तयार करण्यात आल्या असून त्या दुसऱ्या चांगल्या नोटांना चिपकविण्यात आल्या आहेत. एका कडेने मोजल्या असत्या सर्व नोटा चांगल्या असल्याचे वाटते. मात्र ज्या कडेने रबर लावण्यात येते तेथून मोजल्या असत्या या नोटा कमी असल्याचे लक्षात येते. हे नोटांचे ‘मॅजिक’ नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. या नोटा दोनपैकी नेमक्या कुठल्या बँकेतून मिळाल्या हे निश्चितपणे सांगू शकत नाही, असे मेश्राम यांनी सांगितले.