शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

महापारेषणचे सबस्टेशन ठप्प, ७० हजार घरे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 21:58 IST

शहरातील मोठ्या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या मानकापूर सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बुधवारी दुपारी तब्बल ७० हजारापेक्षा अधिक घरांची वीज गेली. सूत्रानुसार चीनमधून आयात करण्यात आलेल्या उपकरणात त्रुटी निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. सध्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने प्रभावित परिसरातील वीज पुरवठा दुसऱ्या सबस्टेशनशी जोडून काम चालवले आहे.

ठळक मुद्देचीनवरून आयात उपकरणात तांत्रिक त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मोठ्या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या मानकापूर सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बुधवारी दुपारी तब्बल ७० हजारापेक्षा अधिक घरांची वीज गेली. सूत्रानुसार चीनमधून आयात करण्यात आलेल्या उपकरणात त्रुटी निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. सध्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने प्रभावित परिसरातील वीज पुरवठा दुसऱ्या सबस्टेशनशी जोडून काम चालवले आहे.सूत्रानुसार बुधवारी दुपारी १ वाजता मानकापूर येथील १३३ केव्ही क्षमतेच्या सब स्टेशनमधून ३३ केव्ही वीज पुरवठा लाईनमध्ये लागलेले दोन तारांना जोडणारे उपकरण खराब झाले. हे उपकरण सहा महिन्यांपूर्वीच चीनमधून आणले गेले होते. यामुळे एसएनडीएलच्या पाच सब स्टेशनामधील वीज पुरवठा प्रभावित झाला. यामध्ये एमएफओ, एमआरएस, नारा, बिजलीनगर, सेमिनरी हिल्स, गोरेवाडा या परिसराचा समावेश आहे. यासोबतच कामठी रोड, जरीपटकासह उत्तर नागपुरातील बहुतांश भाग, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, बैरामजी टाऊन, वायुसेनानगर आदी प्रभावित झाले. वायुसेनानगरला लगेच दुसऱ्या सब स्टेशनसोबत जोडण्यात आले. परंतु एलेक्सीस हॉस्पिटल, एनएडीटी आणि फायर कॉलेजसारख्या एचटी ग्राहकांनामात्र दुसऱ्या सबस्टेशनशी जोडता आले नाही. तब्बल तीन तासानंतर सेक्शनायजरला हटवून दोन्ही लाईन जोडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.गोरेवाडा वॉटर वर्क्सही प्रभावितएसएनडीएलनुसार मानकापूर सब-स्टेशनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोरेवाडा येथील वॉटर वर्क्स येथील वीज पुरवठाही प्रभावित झाला. गोधनी येथील वॉटर वर्क्सची वीजही गायब होती. महापारेषणने तांत्रिक बिघाडाची माहिती एसएनडीएलला देण्यासही उशीर केला. १२.५५ ला तांत्रिक बिघाड झाला. परंतु त्याची माहिती एसएनडीएलला १.३० वाजता मिळाली.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनnagpurनागपूर