उपराजधानीला चिनी फटाक्यांचा धोका

By Admin | Updated: November 6, 2015 03:59 IST2015-11-06T03:59:02+5:302015-11-06T03:59:02+5:30

दिवाळी हा प्रकाशाचा सण. सर्वजण उत्साहाने तो साजरा करण्याची तयारी करीत असल्याची लगबग सर्वत्र दिसत आहे.

Substantial risk of Chinese crackers | उपराजधानीला चिनी फटाक्यांचा धोका

उपराजधानीला चिनी फटाक्यांचा धोका

नागपूर : दिवाळी हा प्रकाशाचा सण. सर्वजण उत्साहाने तो साजरा करण्याची तयारी करीत असल्याची लगबग सर्वत्र दिसत आहे. परंतु दिवाळीचा हा जल्लोष, उत्साह, पावित्र्याला चिनी फटाक्यांचे गालबोट लागले आहे. या फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. यामुळेच चिनी फटाक्यांच्या विक्रीवर कडक बंदीचे आदेश आहेत. असे असतानाही उपराजधानीतील गांधीबाग, इतवारीतील लाल इमली, जरीपटका यासारख्या अतिगर्दीच्या ठिकाणी हे फटाके सर्रास विकले जात असल्याचे वास्तव आहे.

Web Title: Substantial risk of Chinese crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.