शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी भूखंडांवरील क्लब्सचा लेखापरीक्षण अहवाल सादर करा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:15 IST

सरकारी भूखंडांवर कार्यरत क्लब्सचा लेखापरीक्षण अहवाल येत्या आठ आठवड्यात सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित समितीला दिला. संबंधित समितीमध्ये या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर व एक सनदी लेखापाल (सीए) यांचा समावेश आहे. क्लब्स सरकारी भूखंडांचा व्यावसायिक उपयोग करीत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देसमितीला आठ आठवड्याची मुदत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी भूखंडांवर कार्यरत क्लब्सचा लेखापरीक्षण अहवाल येत्या आठ आठवड्यात सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित समितीला दिला. संबंधित समितीमध्ये या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर व एक सनदी लेखापाल (सीए) यांचा समावेश आहे. क्लब्स सरकारी भूखंडांचा व्यावसायिक उपयोग करीत असल्याचा आरोप आहे.यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने क्लब्सचा लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी समितीला सहा महिन्याचा वेळ दिला होता. परंतु, या मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी, न्यायालयाने हा सुधारित आदेश दिला. क्लब्सना कोणकोणत्या मार्गाने किती आर्थिक उत्पन्न होते, ते कोणकोणत्या कामांवर खर्च केले जाते, कोणते क्लब्स नफ्यामध्ये कार्यरत आहेत व कोणत्या क्लब्सना दरवर्षी किती तोटा होत आहे याची माहिती अहवालात द्यायची आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या क्लब्सचे पितळ उघडे पडणार आहे.११३ क्लब्सकडे सरकारी भूखंडजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, शहरामध्ये ११३ क्लब्सना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा इत्यादी उपयोगासाठी सार्वजनिक उपयोगाचे भूखंड लीजवर देण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक क्लब्स भूखंडांचा व्यावसायिक उपयोग करीत आहेत. क्लब्समध्ये लग्न, साखरपुडा, प्रदर्शने, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम आयोजित होत आहेत. त्यातून क्लब्सना आर्थिक लाभ होत असला तरी, सरकारच्या तिजोरीत मात्र काहीच महसूल गोळा होत नाही. सरकारी भूखंडांचा व्यावसायिक उपयोग करणाºया काही क्लब्समध्ये आंध्र असोसिएशन, भगिनी मंडळ, सीपी क्लब, लेडिज क्लब, आॅफिसर्स क्लब, जवाहर विद्यार्थी गृह, वायएमसीए, व्हीसीए, चरखा संघ, युनायटेड फ्री चर्च, विदर्भ साहित्य संघ व विदर्भ हिंदी साहित्य संमेलनचा समावेश आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे