शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

उपराजधानी अयोध्यामय : सायंकाळी रोषणाई, घरोघरी दिवे लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 9:11 PM

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागपुरात देखील जागोजागी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराममंदिर भूमिपूजनप्रसंगी जागोजागी आनंदोत्सव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने नागपुरात देखील जागोजागी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कुठे ‘रामधून’ वाजविण्यात येणार आहे, तर कुठे भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येलाच नागपुरातील विविध चौकात वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’च्या संसर्गामुळे मंदिरे बंद असली तरी सायंकाळी बहुतांश महत्त्वाच्या मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे.

रामजन्मभूमीच्या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली. संघ मुख्यालय असल्यामुळे स्वयंसेवकांमध्ये जास्त उत्साह दिसून येत आहे. विविध स्वयंसेवी संघटनांकडून शहरातील विविध ठिकाणी सकाळपासूनच रामरक्षा, हनुमान चालिसा, श्रीराम जयरामचा जयघोष, पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी सूर्यास्त होताच घरोघरी दीप उजळले जाणार असल्याने बुधवारी दिवाळीसदृश चित्र दिसणार आहे. नागपुरातील विविध चौकात श्रीराम पोस्टर्सदेखील लावण्यात आले आहेत.
नागरिकांकडूनदेखील पुढाकारअनेक उत्साही नागरिकांनी तर मंदिरांसोबतच स्वत:च्या घरावरदेखील रोषणाई केली आहे. सकाळपासूनच घरांमध्ये ‘रामधून’ वाजविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळाविहिंपतर्फे महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा करण्यात येईल. तर संघाकडून कुठलाही अधिकृत कार्यक्रम नसला तरी शाखानिहाय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यादरम्यान नागरिकांनी अतिउत्साह न दाखवता ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे, असे आवाहन संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.‘सोशल मीडिया’ राममयमंगळवारी ‘सोशल मीडिया’वरदेखील राममंदिर भूमिपूजनाचीच चर्चा दिसून आली. प्रोफाईल पिक्चर्समध्ये अनेकांनी राममंदिराची छबी असलेले छायाचित्र ‘अपलोड’ केले आहेत. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे काही महिला मंडळांनी ‘आॅनलाईन’ रामरक्षा पठनाचे आयोजन केले आहे.भाजपाकडूनदेखील तयारी
बुधवारी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भाजपतर्फे चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनाच्या निमित्ताने नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी रामपूजन करतील; सोबतच प्रसाद वितरण, भजन, कीर्तन यांचे आयोजन करण्यात येईल. मोठ्या चौकात आतषबाजी करण्यात येईल व सायंकाळी परिसरातील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात येईल. नागरिकांनीदेखील सायंकाळी घरासमोर दिवे लावून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व नागपुरात ५०० किलो लाडूचे वितरण करण्यात येईल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरnagpurनागपूर