शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्टाइरीन गॅस प्रभावितांना वर्षभर आरोग्य तपासणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 13:00 IST

विशाखापट्टणम येथे स्टाइरीन गॅस लीकमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना तब्बल वर्षभर आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी) व आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (एपीपीसीबी) यांनी यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ठळक मुद्दे नीरी व एपीपीसीबी पथकाने केले सर्वेक्षण

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशाखापट्टणम येथे स्टाइरीन गॅस लीकमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना तब्बल वर्षभर आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी) व आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (एपीपीसीबी) यांनी यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.या घटनेनंतर नीरीच्या पाच शास्त्रज्ञांचे पथक विजागला पोहचले. त्यात डॉ. के. कृष्णमूर्ती, जी. के. खडसे व के. व्ही. जॉर्ज यांच्यासह दोन कनिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. ते १२ मे रोजी नागपुरात परत येण्याची शक्यता आहे. या पथकासह एपीपीसीबीच्या तज्ज्ञांनी वेंकटपुरम, वेंकटाद्रीनगर, नंदमुरीनगर, पिदबांबा कॉलनी व बीसी कॉलनी या प्रभावित क्षेत्रांमध्ये जमिनीपासून १.५ ते ४.५ फूट उंचीपर्यंत सर्वेक्षण केले. दरम्यान, केवळ एकाच घरामध्ये १.७ पीपीएम स्टाइरीन आढळून आले. मोकळ्या परिसरात व रोडवरील घरांमध्ये हा गॅस दिसून आला नाही.अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे१ - घरातील धूळ सॅनिटायझरने स्वच्छ करावी.२ - फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे सेवन करू नये. प्राण्यांनाही देऊ नये.३ - वायुबंद वस्तू सॅनिटाईझ करून उघडाव्या.४ - सर्व भांडी स्वच्छ धुवावी.५ - घरात रुम फ्रेशनरऐवजी अगरबत्ती व धूपचा वापर करावा.६ - प्रभावित क्षेत्रातील भाजीपाला सेवन करू नये.७ - लहान झाडे उपटून फेकून द्यावीत.८ - दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.९ - मोकळ्या जागेतील पाणी वापरू नये.१० - चार चाकी वाहनांना स्वच्छ व व्हेंटिलेट करावे.

 

टॅग्स :Healthआरोग्य