शहर बसची संख्या न वाढल्याने विद्यार्थी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:19+5:302021-01-13T04:21:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, मेट्रो, ...

शहर बसची संख्या न वाढल्याने विद्यार्थी त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, मेट्रो, रेल्वे, एसटी बस पूर्ण क्षमतने सुरू झाल्या आहेत. परंतु शहर बस ३० ते ३५ टक्के धावत आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्रस्त झाले आहेत.
इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. लवकरच शाळा, कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू होतील. अशा परिस्थितीत बस पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात १७२ बस धावत आहेत. वास्तविक शहर बस ताफ्यात ४३७ बसेस आहेत. कोरोनापूर्वी शहर बसमधून दररोज १.६० नागरिक प्रवास करीत होते. यात ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. बस पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.