शिक्षकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग
By Admin | Updated: February 26, 2017 16:09 IST2017-02-26T16:09:30+5:302017-02-26T16:09:30+5:30
शिकवणी वर्गात बसलेल्या विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करणा-या शिक्षकाला बजाजनगर पोलिसांनी अटक

शिक्षकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग
नागपूर : शिकवणी वर्गात बसलेल्या विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करणा-या शिक्षकाला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. रविंद्र सुरेंद्र बानाईत (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे. तो बजाजनगरात राहतो.
आरोपी बानाईत विवाहित आहे. त्याला सात वर्षांचा एक मुलगा आहे. पत्नी सोडून गेल्यामुळे तो आईवडील आणि मुलाला घेऊन राहतो. तो स्वत:च्या घरी शिकवणी वर्ग चालवतो. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता शिकवणी सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अन्य विद्यार्थीनी वर्गाबाहेर जाऊन बसल्या. तर, पीडित विद्यार्थीनी एकटीच वर्गात बसून होती. ते पाहून आरोपीने तिला जवळ ओढले. त्याने लज्जास्पद वर्तन केल्याने विद्यार्थीनी ओरडली. ते ऐकून बाजुच्या मुली धावत आल्या. त्यानंतर आरोपी वर्गातून निघून गेला. पीडित मुलीने घरी येऊन पालकांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीला घेऊन बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एम. के. शेख यांनी विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार कारवाई करून त्याला अटक केली.