शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांची होतेय फरफट : प्रवेशाची लगबग आणि सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 9:05 PM

अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसेतू केंद्रात व्यक्त केला विद्यार्थ्यांनी संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी आणि फार्मसी कॉलेजसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा चांगलाच फटका बसतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची गर्दी आणि सेतू केंद्रावरील असुविधा यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून चांगलाच संताप व्यक्त होत होता. अखेर विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, सेतू केंद्राने दीडशे विद्यार्थ्यांच्या दस्तावेजाच्या तपासणीचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजता १५० विद्यार्थ्यांना टोकन देऊन इतरांना घरी पाठविण्यात आले.सलग दोन दिवस सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्तावेजाच्या पडताळणीचे काम थांबविले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी ७ पासून विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रावर गर्दी केली होती. यावर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या नियंत्रणात करण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी २१ जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी शहरातील काही कॉलेजमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सीईटी सेलने ही सर्व प्रक्रिया कल्प टेक्नॉलॉजिस्ट प्रा. लि. या कं पनीला दिली आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर दस्तावेजाची तपासणीचे कामाला अडथळा येत आहे. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयात हे सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी या केंद्रावर जवळपास ७०० ते ८०० विद्यार्थी व पालक पोहचले होते. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी १२ नंतर सर्व्हर सुरू झाले. पण काम संथ गतीने होत असल्याने सेतू केंद्रातील ऑपरेटरने फक्त १५० विद्यार्थ्यांचे दस्तावेजाचे काम पूर्ण होईल, असे सांगून इतर विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसानंतरचेही टोकन वाटप केले.जे विद्यार्थी सकाळपासून पोहचले होते. त्यातील १५० विद्यार्थ्यांना दस्तावेजाच्या तपासणीसाठी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे सेतू केंद्रावर अपेक्षित माहिती देण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. सुरक्षा रक्षकाकडून अडवणूक करण्यात येत आहे.सीईटी सेलचे नियंत्रण फेलयापूर्वी प्रवेश प्रक्रिया डीटीईद्वारे राबविण्यात येत होती. तेव्हा एवढा त्रास विद्यार्थ्यांना झाला नाही. यावर्षी सीईटी सेलने ही प्रक्रिया स्वत:कडे घेऊन, त्यात चांगलीच गुंतागुंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. सीईटी सेलचे नियंत्रण फेल ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय