शिक्षकाच्या त्रासामुळे विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:41 IST2018-08-17T23:40:20+5:302018-08-17T23:41:53+5:30
सदर येथील सेंट जॉन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी फिनाईल पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. त्याला जनता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पीडित विद्यार्थी जरीपटका येथील मार्टिननगर येथे राहतो.

शिक्षकाच्या त्रासामुळे विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर येथील सेंट जॉन शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी फिनाईल पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. त्याला जनता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. पीडित विद्यार्थी जरीपटका येथील मार्टिननगर येथे राहतो.
यासंदर्भात विद्यार्थ्याच्या वडिलांनी आरोप केला की, शाळेचे शिक्षक पराग तोराने यांनी मुलाची शारीरिक व मानसिक प्रताडणा केली आहे. शाळेतून काढण्याची धमकी त्याला देण्यात आली होती. तो अभ्यासात कमजोर असल्याने त्याला शिक्षकाकडून नेहमीच टार्गेट केले जात होते. यासंदर्भात वडिलांनी पर्यवेक्षक कुंभलकर यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यामुळे पर्यवेक्षक सुद्धा त्याला त्रास देत होता. शिक्षकाच्या त्रासापासून कंटाळून मुलाने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यासंदर्भात विद्यार्थ्याच्या पालकाने जरीपटका पोलिसांना सूचना दिली. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. मुलाचे बयान घेतल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहे. विद्यार्थ्याचे मामा स्टेनली जेरोम यांनी घटनेला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली आहे.