नागपूर जिल्ह्यातील हरदोली येथे विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST2018-10-14T00:08:04+5:302018-10-14T00:10:54+5:30
शालेय विद्यार्थ्याने गोठ्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली (नाईक - पुनर्वसन) येथे घडली.

नागपूर जिल्ह्यातील हरदोली येथे विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कुही) : शालेय विद्यार्थ्याने गोठ्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरदोली (नाईक - पुनर्वसन) येथे घडली.
आकाश प्रकाश कामळी (१३, रा. सेलोटी, ता. भिवापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुकुंदराजस्वामी माध्यमिक शाळा नवेगाव (चिचघाट), ता. कुही येथे इयत्ता आठवीत शिकायचा, शिवाय शिक्षणासाठी तो आजोबाकडे हरदोली (नाईक) येथे राहायचा. तो गुरुवारी सकाळी शाळेत गेला आणि दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरी परत आला. आकाशचा मामा गौरीशंकर फकीरा पडोळे हा गोठ्यात गाईला पाणी पाजण्यासाठी गेला असता, त्याला आकाश छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आकाशला डॉक्टरांकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. आकाशने टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी आकाशचे आजोबा फकीरा पडोळे (६०) यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.