शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विद्यार्थिनीची कन्हान नदीत उडी : शोधकार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:28 AM

कला शाखेच्या विद्यार्थिनीने पुलावरून कन्हान नदी उडी मारली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - पारशिवनी मार्गावर गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देखापरखेडा परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा ): कला शाखेच्या विद्यार्थिनीने पुलावरून कन्हान नदी उडी मारली. वृत्त लिहिस्तो तिचा थांगपत्ता लागला नव्हता. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - पारशिवनी मार्गावर गुरुवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. तिने सदर पाऊल प्रेमप्रकरणातून उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली.पूजा साहू (१९, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिची अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याशी मैत्री होती. शिवाय, त्याच्या कुटुंबीयांचे पूजाच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध असून, दोन्ही कुटुंब भानेगाव येथे शेजारी राहतात. पूजाचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे ती तणावात होती. या विषयाचा निपटारा करण्यासाठी दोघेही गुरुवारी दुपारी भेटले होते.तो तिला सोबत घेऊन कोराडीला गेला होता. तिथे याच विषयावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्याने तिची समजूत काढली आणि तिला घेऊन भानेगावला आला व पारशिवनी मार्गे तामसवाडीला गेले. त्यानंतर दोघेही चर्चा करीत खापरखेडा - पारशिवनी मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावर आले. आधार कार्ड पडल्याचा बहाणा करीत तिने पुलावर गाडी थांबविली. त्यावेळी तो फोनवर बोलत होता. त्याचे लक्ष नसल्याचे पाहून ती पुलाच्या कठड्यावर चढली. त्याचवेळी त्याचे तिच्याकडे लक्ष गेले.त्यामुळे तो ओरडत तिच्या दिशेने धावला. तो तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तिने पुलावरून नदीत उडी मारली. नदी दुथडी भरून असल्याने ती प्रवाहाबरोबर वाहत गेली. त्यातच त्याने तिच्या चपला घेऊन पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून तिचा शोध घेतला असता, कुठेही थांगपत्ता लागला नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी