शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

'पुन्हा भेटत राहू' असे लिहून विद्यार्थ्याने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:05 PM

‘पुन्हा भेटत राहू’ असे लिहून ठेवत आई-वडिलांना बाय बाय करून एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्याचप्रमाणे सीताबर्डी आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही आत्मत्येच्या दोन वेगळ्या घटना घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पुन्हा भेटत राहू’ असे लिहून ठेवत आई-वडिलांना बाय बाय करून एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्याचप्रमाणे सीताबर्डी आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही आत्मत्येच्या दोन वेगळ्या घटना घडल्या.अलंकार नगर दिवाण ले-आऊट येथे राहणारा कौस्तुभ गजेंद्र रामटेके ( वय १५) याने शुक्रवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. कौस्तुभ नववीची परीक्षा पास करून दहावीत गेला होता. त्याचे वडील पेंटिंग करतात तर आई घरकाम करते. रामटेके दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्यांनी आई-वडिलांना यापुढेही भेटत राहू, असे म्हणत बाय-बाय केला आहे. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झालेले नाही. एकुलत्या एक मुलाने अशा पद्धतीने आत्महत्या केल्यामुळे त्याची आई आरती आणि वडील गजेंद्र या दोघांना जबर मानसिक धक्का बसला आहे. शेजारीही हळहळ व्यक्त करीत आहेत. हवालदार शैलेश ठवरे यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टीत राहणारे जीवन समारराय वर्मा (वय ६०) यांनी शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या सूचनेवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.तिसरी आत्महत्येची घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनगरमध्ये घडली. धीरज निळकंठ उमरेडकर (वय ३३) यांनी शुक्रवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ८ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जयश्री धीरज उमरेडकर यांनी दिलेल्या सूचनेवरून शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्या