गोव्यात लैंगिक चाळे केल्याची विद्यार्थिनीची तक्रार

By Admin | Updated: November 18, 2014 00:52 IST2014-11-18T00:52:49+5:302014-11-18T00:52:49+5:30

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या अनुमतीने युजीसी (नेट) परीक्षा आणि शोध प्रबंधासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी विद्यापीठाच्याच एका विद्यार्थ्यांने लैंगिक

Student complaint about sexual conduct in Goa | गोव्यात लैंगिक चाळे केल्याची विद्यार्थिनीची तक्रार

गोव्यात लैंगिक चाळे केल्याची विद्यार्थिनीची तक्रार

हिंदी विद्यापीठातील घटना : कारवाईसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या अनुमतीने युजीसी (नेट) परीक्षा आणि शोध प्रबंधासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी विद्यापीठाच्याच एका विद्यार्थ्यांने लैंगिक चाळे केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली. मात्र या घटनेला तीन महिने लोटूनही कुठलीच कारवाई झाली नाही, उलट प्रशासनानेच पीडित विद्यार्थिनीवर प्रशासनात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे पत्र दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारपासून कुलगुरुंच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, २८ जून ते १ जुलै २०१४ या कालावधीत विभागाच्या परवानगीने युजीसी परीक्षा व शोध प्रबंधासाठीची माहिती संकलित करण्यासाठी ती गोवा विद्यापीठात गेली होती. विद्यापीठातील साहित्य विभागाचा विद्यार्थी संजीवकुमार झा आणि अलाहाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी वीरेंद्र प्रताप सोबत होते. तिघेही विद्यार्थी विश्राम भवनात थांबले होते. ३० जून रोजी तिघेही विद्यापीठाच्या गं्रथालयातील कामे आटोपून कलिंगड बीचवर फिरायला गेले. त्याठिकाणी संजीवकुमार झा मद्याच्या नशेत गैरवर्तन करु लागला. त्याने अश्लील शब्दात शारीरिक संबंधाची मागणी केली. प्रतिकार केला असता त्याने वीरेंद्रला मारहाण करून शिवीगाळ केली. विरोध करताच त्याने वीरेंद्रचा गळा दाबून त्याच्या तोंडावर चप्पल मारली. ही घटना रात्री ८ च्या सुमाराची आहे. गोवा अपरिचित असल्यामुळे पोलिसात तक्रार केली नाही. विद्यापीठाकडून न्यायाची अपेक्षा होती. तेथून परतताच प्रकरणाचे गांभिर्य विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले, मात्र कारवाई झालेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Student complaint about sexual conduct in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.