अट्टल गुन्हेगार चक्क भिकाऱ्याच्या वेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 22:12 IST2020-06-08T22:11:40+5:302020-06-08T22:12:58+5:30

भिकाऱ्याच्या वेशात दिवसभर रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले.

Stubborn criminals in the guise of beggars | अट्टल गुन्हेगार चक्क भिकाऱ्याच्या वेशात

अट्टल गुन्हेगार चक्क भिकाऱ्याच्या वेशात

ठळक मुद्देदिवसा रेकी, रात्री घरफोडी : १० गुन्हे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिकाऱ्याच्या वेशात दिवसभर रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले. बबलू ऊर्फ डांगा राजाराम मोहनिया (वय ३२) आणि अभय धनराज देशपांडे (वय ३४) अशी या दोघांची नावे आहेत.
दिवसभर हे दोघे वेगवेगळ्या भागात भिकाऱ्याचा वेश करून कुठे घरफोडी करायची ते ठरवत होते आणि रात्रीच्या वेळेस घरफोडी करून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करीत होते. गुरुवारी रात्री तहसील पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कुख्यात बबलू ऊर्फ डांगा संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण २ जूनला इतवारीतील जगदीश ट्रेडिंग कंपनीत घरफोडी केल्याचे सांगितले सोबतच अन्य दहा घरफोड्यांचीही कबुली दिली. हे गुन्हे जरीपटक्यातील आरोपी अभय देशपांडेच्या मदतीने केल्याचेही डांगाने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी देशपांडेलाही अटक केली. या दोघांकडून चोरलेल्या रकमेपैकी ११ हजार २०० रुपये तसेच वेगवेगळे साहित्य जप्त करण्यात आले.

Web Title: Stubborn criminals in the guise of beggars