एसटीची आंतरराज्य बससेवा सुरू; वाढले उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 10:42 IST2020-09-29T10:41:54+5:302020-09-29T10:42:19+5:30
पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरूकेले आहे. त्यानुसार आंतरराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एसटीची आंतरराज्य बससेवा सुरू; वाढले उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरूकेले आहे. त्यानुसार आंतरराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने मालवाहतूक, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्डिंग करणे सुरू केले. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरू केले आहे. त्यानुसार मध्य प्रदेशात गणेशपेठ आगारातून खमारपाणी येथे सकाळी ११.१५ वाजता, रंगारी येथे सकाळी ७.१५. ९ वाजता आणि दुपारी २ वाजता, बिछवा येथे सकाळी ८ वाजता, दुपारी ४.३० वाजता, पचमढी येथे ८.१५ वाजता, पांढुर्णाला सकाळी ७.१५ व ८.५० वाजता, छिंदवाडाला सकाळी ७.३० व ९ वाजता, मोहगावला सकाळी १०.३० वाजता, सायंकाळी ६ वाजता, पिंपळा (नारायणवार) सकाळी ८.४५ वाजता, लोधीखेडाला सकाळी ८.१५ वाजता, रामाकोनाला दुपारी १ वाजता, बेरडीला सकाळी ६.४५ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता, लालबर्रा येथे सकाळी ७.५० वाजता बसेस सोडण्यात येतील.
तेलंगणा राज्यात हैदराबादला सकाळी ६ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता, आदिलाबादला सकाळी ९ वाजता, दुपारी १.३० वाजता, मंचेरियलला दुपारी १२ वाजता, छत्तीसगडमध्ये रायपूरला दुपारी २ वाजता आणि राजनांदगावला सकाळी ७ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत. आंतरराज्यात बसेस सुरू केल्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले असून एसटीला चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती गणेशपेठचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली.
आंतरराज्य वाहतुकीला प्रतिसाद
पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचा एसटीला प्रतिसाद लाभत आहे. आंतरराज्यात जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यासाठी एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरू केले आहे. या बसेसलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.