शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

जगण्यासाठी संघर्ष :चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सानिकाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:59 PM

माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले तिचे वडील प्रदीप थूगावकर यांना उपचाराचा खर्च झेपत नसल्याने मुलीला जगवावे तरी कसे या चिंतेने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीसमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देउपचारावरील खर्चासाठी हवी आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले तिचे वडील प्रदीप थूगावकर यांना उपचाराचा खर्च झेपत नसल्याने मुलीला जगवावे तरी कसे या चिंतेने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीसमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) हिच्यावर १ जुलै रोजी माथेफिरू युवकाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. सानिकाला तातडीने आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया केली. मूत्रपिंड निकामी झाल्याने तिला डायलिसीस सुरू केले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरमधून कृत्रिम श्वास दिला जात आहे. तिची प्रकृती अद्यापही गंभीर असलीतरी ती उपचारात मदत करीत असल्याने पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णालयाचा व उपचाराचा रोजचा खर्च हजारो रुपयांचा आहे. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले तिच्या वडिलांनी उधार-उसनवारी घेऊन हा खर्च पेलला. परंतु आता हा खर्च झेपत नसल्याने हे कुटुंब अडचणीत आले आहे. पैशाअभावी सानिकावरील उपचार थांबण्याची शक्यता आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास सानिका वाचेल, ही एकमेव आशा आहे. या कुटुंबाच्या वतीने सहयोग ट्रस्ट या समाजसेवी संघटनेने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.हवे मदतीचे बळथूगावकर कुटुंबाला समाजाच्या आर्थिक मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. प्रदीप थूगावकर यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी खामला येथील पंजाब नॅशनल बँक, खाता क्रमांक १४७२०००१००११३२८० यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. याचा आयएफसी कोड क्र. पीयुएनबी ०१४७२०० आहे. ट्रस्टच्या समन्वयक अ‍ॅड. स्मिता सरादे सिंगलकर यांनी थूगावकर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून मदत करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर