शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:20 PM

मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देनागपूर शहराला जूनपर्यंत ८२ दलघमी पाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प (कामठी खैरी) व तोतलाडोहाची एकूण क्षमता ११५७ द.ल.घ.मी आहे. सध्या कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. तर तोतलाडोह प्रकल्पात ७१.९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. अशी परिस्थिती असतानाही कामठी खैरी प्रकल्पातून जून अखेरपर्यंत ६१.२० द.ल.घ.मी. पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक या प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढते. मागणी व उपलब्ध जलसाठा याचा विचार करता मार्च ते ३० जून २०१९ दरम्यान नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयातून ६१.२ द.ल.घ.मी. तर कन्हान नदीतून (पेंच कालव्यातून सोडण्यात येणारे)२०.८ द.ल.घ.मी. पाण्याची गरज भासणार आहे.तूर्त जलसंकट नाहीशहराला जून महिन्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई भासणार आही. सध्या पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.मनोज गणवीर ,कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग

  • जलप्रदाय विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून (कामठी खैरी) १९५.४३. द.ल.घ.मी. कन्हान नदीतून ५३ द.ल.घ.मी., विहिरी व बोरवेलमधून १९.५२ तर गोरेवाडा जलाशयातूत ५.८४ द.ल.घ.मी. असे एकूण २७३.७९ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे.
  • पाणी कमी असलेल्या २०१८-१९ या वर्षात पेंच प्रकल्पातीत १५५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित आहे. वास्तविक १९५.४३द.ल.घ.मी. पाण्याची मागणी होती.
  • पेंच प्रकल्पातील आरक्षित कोट्यातील ११३.७१ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केली आहे. त्यामुळे उर्वरित ८२ द.ल.घ.मी. पाणी कसे मिळणार?
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई