लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी भीषण आग लागली. यात ऑडिटोरियममधील सोफा व फोमच्या खुर्च्या जळून खाक झाल्या. आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे निर्माणाधीन आठ मजली इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील स्लॅप व पिल्लरला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना होऊ नये यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी मंगळवारी झोन कार्यालयाला पत्र पाठवून याबाबत सूचना केली आहे.इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अग्निशमन विभागाकडून इमारतीत आग नियंत्रण यंत्रणा व संकटकालीन आवश्यक उपाययोजना असल्याबाबतचे प्रमाणपत्र घेतले जाते. मात्र ऑडिटोरियमचे काम करताना फोम व ज्वलनशील पदार्थांचा वापर केला जातो. याचा विचार करता आग नियंत्रणाची व्यवस्था करण्याची गरज होती. यासाठी फोर्ट टेबल, सिलींगचे काम करताना कामगारांच्या कमरेला पट्टा बांधणे, अशा स्वरूपाच्या प्राथमिक उपाययोजना अपेक्षित असतात, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. ऑडिटोरियमचे काम करताना वेल्डिंग मशीनचा वापर करण्यात आला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपासात याचा उलगडा होईल. मात्र वेल्डिंग करताना उडालेल्या ठिणगीमुळे फोमने पेट घेतला व ऑडिटोरियमला आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.दररोज ११ इमारतींची तपासणीशहरात बहुमजली इमारती उभ्या राहात आहेत. अशा इमारतींचे बांधकाम नियमानुसार करण्यात आले आहे का, इमारतीत आग नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली की नाही, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाकडून दररोज १० खासगी व एक शासकीय अशा ११ इमारतींची तपासणी केली जाते.तपासात पोलिसांना मदतआगीच्या उष्णतेमुळे इमारतीला हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी झोनला पत्र दिले आहे. ते तज्ज्ञाकडून पाहणी करून आपला अहवाल देतील. आग कशामुळे लागली हा तपासाचा भाग आहे. आग विझवण्याची व आपदग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाची होती. ती यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांना गरज भासल्यास आमच्या विभागाकडून मदत केली जाईल.राजेंद्र उचके, प्रमुख अग्निशमन अधिकारी
जळीत किंग्जवे हॉस्पिटलचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:50 IST
कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी भीषण आग लागली. यात ऑडिटोरियममधील सोफा व फोमच्या खुर्च्या जळून खाक झाल्या. आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे निर्माणाधीन आठ मजली इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील स्लॅप व पिल्लरला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना होऊ नये यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी मंगळवारी झोन कार्यालयाला पत्र पाठवून याबाबत सूचना केली आहे.
जळीत किंग्जवे हॉस्पिटलचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’
ठळक मुद्देभीषण आगीची दखल : आपत्ती व्यवस्थापन विभागाचे झोन कार्यालयाला पत्र