शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नागपूरच्या सीपी क्लबमध्ये जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 9:31 PM

शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राबता असलेल्या सिव्हिल लाईनमधील सीपी क्लबमध्ये मंगळवारी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली. यात एका व्यापाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अत्यंत सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सीपी क्लबमध्ये ही हिंसक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदिवाळी मिलनाची पार्टी : व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राबता असलेल्या सिव्हिल लाईनमधील सीपी क्लबमध्ये मंगळवारी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली. यात एका व्यापाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अत्यंत सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सीपी क्लबमध्ये ही हिंसक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.शहरातील व्यापारी बांधवांपैकी काहींनी मंगळवारी रात्री दिवाळी मिलनाची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सदरमधील फर्निचर व्यापारी ब्रजेश सुशील खेमका हे देखील आपल्या मित्रांसह सहभागी झाले होते. मध्यरात्रीनंतर सुमारे १ च्या दरम्यान खेमका बाथरूमला जात असताना त्यांना काही तरुणांमध्ये वाद होताना दिसला. खेमका यांनी ओळखीची मंडळी दिसल्यामुळे त्यांना वादाचे कारण विचारून समेट करण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यासोबत जसप्रीत तुली नामक तरुणाची बाचाबाची झाली. वाद टाळण्यासाठी सुमीत नामक मित्राने खेमका यांना तेथून सोबत नेले. दरम्यान, ते पोर्चमध्ये आपल्या मित्रांची वाट बघत असताना जसप्रीत आणि त्याचे काही मित्र तेथे आले. त्यांनी पुन्हा खेमकासोबत वाद घातला. धक्काबुक्कीत खेमका यांचा जसप्रीतच्या पगडीला धक्का लागला. ते कारण पुढे करून जसप्रीतने तेथील काचेचे ग्लास उचलले आणि खेमकाच्या डोक्यावर मारले. परिणामी खेमका यांना गंभीर दुखापत झाली. ते पाहून खेमकांचे मित्र मदतीला धावले असता आरोपी जसप्रीत आणि त्याचे मित्र शिवीगाळ करून धमकी देत पळून गेले. दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात व्यापाऱ्यांची अशा प्रकारे दिवाळी पहाट झाल्याने शहरात खळबळ उडाली. खेमका यांना एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून घेतल्यानंतर सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून आरोपी जसप्रीत तसेच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींना अटक करण्याची मागणी व्यापाºयांनी लावून धरली. हे प्रकरण वरिष्ठांकडेही गेले. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी गुरुवारी सीपी क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCivil lineसिव्हिल लाइन