शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

येणाऱ्या निवडणुकीत विदर्भातील जनतेपुढे सशक्त पर्याय : अ‍ॅड. श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 20:01 IST

सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृती करून, येणाऱ्या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सशक्त पर्याय देण्यासाठी सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षांनी महामंचची निर्मिती केली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका विदर्भासाठी आंदोलन म्हणून लढण्यात येईल, असे सूतोवाच विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय पक्षांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृती करून, येणाऱ्या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सशक्त पर्याय देण्यासाठी सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षांनी महामंचची निर्मिती केली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका विदर्भासाठी आंदोलन म्हणून लढण्यात येईल, असे सूतोवाच विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगळ्या विदर्भासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य निर्माण यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली. यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी अ‍ॅड. श्रीहरी अणे उपस्थित होते. २ ते १२ जानेवारी दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात ही यात्रा फिरणार आहे. बुधवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी आम आदमी पार्टीचे ब्रिगेडियर सुधीर सावंत, विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, जांबुवंतराव धोटे विचार मंचचे सुनील चोखारे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, विजया धोटे, अ‍ॅड. संजय नेरकर, अ‍ॅड. वीणा मूल, दिलीप नरवडिया, रमेश गजबे, अशोक मिश्रा, बसंत चौरसिया, पूर्णिमा भिलावे, शेखर रोकडे, अशोक मिश्रा, पुरुषोत्तम खराळकर, गणेश शर्मा, देवेंद्र वानखेडे, श्रीकांत तरार, राजू नागुलवार, जगजितसिंग, कविता सिंगल, सुनंदा खैरकर, नूतन रेवतकर, प्रीती देडमुठे, विद्या खरडकर, प्राजक्ता भेलकर, अर्चना एलकुंचवार, डी.ओ. म्हैमाने, घनश्याम पुरोहित आदी उपस्थित होते. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार असून, तिथे बैठका आणि सभेच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. यात्रेचा समारोप १२ जानेवारी रोजी नागपुरात होणार आहे. समारोपात सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी एकत्र येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचा बिगुल फुंकणार आहे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliticsराजकारण