संविधान रक्षणासाठी संघटन मजबूत करा - भीम राजभर
By आनंद डेकाटे | Updated: August 18, 2023 15:03 IST2023-08-18T15:02:39+5:302023-08-18T15:03:49+5:30
बसपा कार्यकर्ता मेळावा

संविधान रक्षणासाठी संघटन मजबूत करा - भीम राजभर
नागपूर : बहुजनांनो जर भारताचे संविधान वाचवायचे असेल तर बहुजन समाजाचे संघटन असलेल्या बसपाला मजबूत करावे, असे आवाहन बसपाचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर यांनी व्यक्त केले.
बसपातर्फे नागपुरात विधानसभा निहाय बैठका सुरु आहेत. वाठोडा येथील संत गोरा कुंभार सभागृहात पूर्व नागपूर विधानसभा संघटन आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजभर बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने यांनी समाजावरील अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर मायावती यांच्या नेतृत्वातील बसपाला शासक बनवावे असे आवाहन केले.
समाजाची खरी ताकद ही संघटनेत असते आणि संघटना ही स्थानिक बूथ पासून तर सेक्टर व विधानसभा स्तरावरील कार्यकर्त्यांच्या भरोशावर असते. हा कार्यकर्ताच मुळात पक्षाचा कणा असतो असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी एड सुनील डोंगरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नागोराव जयकर, पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, जितेंद्र घोडेस्वार, उत्तम शेवडे, राहुल सोनटक्के, संदीप मेश्राम, मुकेश मेश्राम, एड ध्रुवकुमार मेश्राम, सचिन मानवटकर, अनिल घुसे, सागर लोखंडे, रोशनी दास आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक धर्मपाल गोंगले यांनी केले. संचालन संजय इखार यांनी तर छबीता पाटील यांनी आभार मानले.